सातारा : स्वाभिमानी रामोशी महासंघाचे संस्थापक सचिव सदाशिवराव नाईक यांची छत्रपती युवा सेनेच्या सातारा जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते नुकतेच पुण्यात झालेल्या कार्यक्रमात त्यांना प्रदान करण्यात आले. याबाबत छत्रपती युवा सेनेतर्फे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकातील माहितीनुसार, कोल्हापुरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेली छत्रपती युवा सेना ही सामाजिक संघटना असून त्यामाध्यमातून समाजाच्या विविध घटकातील व्यक्तींना मदत आणि मार्गदर्शन केले जाते.
समाजजीवनातील सर्व घटकांना आदर, सन्माना आणि त्यांच्या कौशल्यास प्रेरणा देणे, कोणावरही अन्याय होत असेल तर त्यातून पिडतांना न्याय मिळवून देणे, तसेच दारूबंदी, स्त्री सन्मान, शिक्षण, ऐतिहासिक प्रेरणास्थळांचे जतन, गुणीजनांचा गुणगौरव, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व मदत याशिवाय सुशिक्षित अशिक्षित युवकांना त्यांच्या शिक्षणाच्या अनुशंगाने योग्य रोजगारसंधी, नोकरी व व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन आदी विविध उद्देशाने ही संघटना कार्यरत आहे. या संघटनेेचे संस्थापक अध्यक्ष नाशिकचे गणेशभाउ कदम असून त्यांच्या समवेत संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक मान्यवर काम करीत आहेत.
या संघटनेचा राज्यस्तरीय मेळावा नुकताच पुण्यामध्ये झाला. त्यावेळी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत श्री. नाईक यांची सातारा जिल्ह्याचे प्रमुख म्हणून एकमुखाने निवड करण्यात आली व निवडीचे पत्रही युवराज संभाजीराजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सदाशिवराव नाईक यांनी शिक्षण, समाजसेवा आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांच्या या कार्याची दखल घेवून ही निवड करण्यात आल्याचे सांगून भविष्यात त्यांनी आणखी उज्वल कामगिरी करावी, अशा शुभेच्छाही युवराज संभाजीराजे यांनी दिल्या.
या कार्यक्रमास संघटनेचे संस्थापक गणेशभाउ कदम, यश बच्छाव, प्रदेश उपाध्यक्ष वसंत बरकले, संतोष टिळे, दारूबंदी जनआंदोलनाच्या सातारा जिल्हाप्रमुख प्रियाताई नाईक, प्रदेश संघटक ज्ञानेश्वर भोसले, पुणे जिल्हाप्रमुख राजू भोसले, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष विलास साबणे, सोनाली मरळ, कांता पवार, सूरज भाग्यवंत, विलासराव गायधनी, शंभूराज नाईक, शिवानी नाईक, नीलेश पाटील, श्रीकांत गायधनी, कृष्णा पर्हाड, दिगंबर पवार, सुनील पवार, आकाश बागुल आदी मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |