RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

तंत्रज्ञानाबरोबर संस्कारही महत्वाचे : अ‍ॅड.उदयसिंह पाटील यांचे प्रतिपादन

04 August 2018 at 02:42

कराड : स्पर्धेच्या युगात तंत्रज्ञानाबरोबरच संस्कारही महत्वाचे आहेत,असे प्रतिपादन रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. उदयसिंह पाटील यांनी व्यक्त केले.

ओंड(ता.कराड) येथील पंडित गोविंद वल्लभपंत विद्यालयात डॉ. नरेंद्र माळी यांच्या सौजन्याने उदयसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व शुध्द पाणी योजना प्रकल्पाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सभापती फरिदा इनामदार होत्या.

अ‍ॅड. पाटील म्हणाले, आज स्पर्धेमुळे विद्यार्थी केवळ पुस्तकी किडा बनत चालला आहे. त्याला बाहय ज्ञान मिळत नाही. परिणामी तो बाहय जगात मागे पडतो. सर्वच क्षेत्रात तो टिकून राहण्यासाठी पालीकांनी लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी केला पाहिजे.

फरिदा इनामदार यांनी विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन केले.

कार्यक्रमास उपसरपंच अजयसिंह  थोरात, संस्थेचे उपाध्यक्ष शिवदास रेळेकर, विजयसिंह थोरात, शशिकांत थोरात, डॉ. नरेद्र माळी, ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रकाश शिंदे यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्राचार्य व्ही.टी.थोरात यांनी प्रास्तावित केले. स्वप्नजा थोरात यांनी सूत्रसंचालन केले. विकास शेवाळे यांनी आभार मानले.

 

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

5 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

5 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

5 hours before