09:09pm | Oct 22, 2018 |
सातारा : देशी दारूच्या दुकानाचे अतिक्रमण काढण्यासाठी नगर पालिका पथक आले होते. त्यावेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले. यावेळी दोन्ही राजेंनी आक्रमक भूमिका घेतली होती. घटना स्थळी पोलिसांचा फौज फाटा दाखल झाला. यावेळी दोन्ही राजेंचे कार्यकर्तेही दाखल झाले होते. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन वातावरण चिघळू नये यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. यावेळी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उदयनराजे यांना जायला सांगा, मग मी जातो. दोन्ही राजे जातच नव्हते. यावेळी पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांचा पारा चढला. मला कायदा हातात घ्यायला लावू नका. मला गाडी चालवता येते. तुम्ही तुमची गाडी पुढे घ्या, असे आ. शिवेंद्रसिंहराजे आणि खा. उदयनराजे यांना सुनावले. त्यानंतर आमदारांची गाडी दक्षिण बाजूला तर खासदारांची गाडी उत्तरेकडे गेली.
समीर खुटाळे यांच्या जागेत नगरसेवक रवी ढोणे यांचे देशी दारूचे दुकान भाड्याने आहे. हे दुकान काढण्यासाठी नगरपालिका अतिक्रमण हटाव पथक आले होते. रवी ढोणे हे आमदार शिवेंद्रसिंहराजे कार्यकर्ते आहेत. यावेळी खासदार उदयनराजे भोसले घटनास्थळी आले. उदयनराजे घटनास्थळी आल्याची माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मिळाली. यावरुन तेही जावलीतून आपल्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी आले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन वातावरण चिघळू नये म्हणून कार्यकर्त्यांना पोलिसांनी पिटाळून लावले. तर काहींना लाठीचा प्रसादही मिळाला. पोलीस उपअधीक्षक राजमाने यांनी सुरवातीला दोन्ही राजांना समजावून सांगितले. पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी राजमाने संतापले आणि शिवेंद्रसिंहराजे यांना वरच्या स्वरात म्हणाले, मला कायदा हातात घ्यायला लावू नका, मलाही गाडी चालविता येते. त्यांनी शिवेंद्रराजेंच्या गाडीतील कार्यकर्त्यांना गाडीतून खाली उतरवून पोलीस निरीक्षक सारंगकर यांना गाडीत बसून शिवेंद्रसिंहराजे यांची गाडी घेऊन जावा, असे सांगितले.
शिवेंद्रसिंहराजे यांनी खासदार जाणार नाहीत, तोपर्यंत मी जाणार नाही, असे राजमानेंना सांगितले. त्यानंतर राजमाने खासदार उदयनराजे भोसले यांच्या गाडीकडे गेले व खालच्या स्वरात महाराज साहेब तुमचीही गाडी जाऊ द्यात, असे म्हणाले. यानंतर खासदार उदयनराजेंची गाडी उत्तरेकडे, तर आमदारांची गाडी दक्षिणेकडे गेली. यानंतर पोलिसांनी बघे व कार्यकर्ते याना हाकलले. तसेच काहींना लाठीचा प्रसादही दिला.
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |

महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |