02:39pm | Oct 11, 2019 |
बिजवडी : माण खटाव तालुक्यात स्वखर्चातून केलेल्या कामाच्या बळावर जनतेच्या मनात शेखरभाऊंनी घर करून ठेवले आहे.त्यामुळे सर्वसामान्य जनतेबरोबरच विशेषत: महिलावर्ग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. महिलाशक्तीने एकदा मनात आणलं की ती काहीही करून दाखवते.तोच निर्धार यावेळी महिलावर्गानी केला असून कोणत्याही परिस्थितीत यावेळी परिवर्तन घडवत शेखरभाऊंना आमदार करायचच असेच सर्वांनी ठरवलेय.तुमचा उत्साह व प्रतिसादच भाऊंच्या विजयाची नांदी असून माताभगिनींनो काहीही काळजी करू नका फक्त खंबीरपणे साथ द्या शेखरभाऊ तुम्हाला आमदारकी च्या रूपाने दिवाळी अगोदर भाऊबीज देतील असा ठाम विश्वास सौ.सोनलताई गोरे यांनी व्यक्त केला आहे. अंबवडे ता.खटाव येथील माताभगिनींशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.यावेळी सौ.सुरेखाताई पखाले व महिलावर्ग उपस्थित होता.
सौ.सोनलताई गोरे म्हणाल्या , दुष्काळी मातीतील दु:खे काय असतात ती दु:खे सोडवण्यासाठी काय काय करावे लागेल त्यासाठी शेखरभाऊ तयार आहेत.तसेच येथील जनतेच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सोडवण्यात निश्चित यशस्वी होतील. आपल्या माथी पिढ्यान पिढ्याचा दुष्काळी कलंक येत्याकाळात निश्चित पुसण्यासाठी व आपल्या काळ्या आईला सुजलाम सुफलाम करण्यासाठी शिवसेना पक्षाच्या पाठीशी जनतेने खंबीरपणे उभे राहवे असे आवाहनही त्यांनी केले.
विरोधकांच्या भूलथापांना व फसवेगिरीला आता जनता कंटाळली आहे.त्यांना ऑन द स्पॉट काम करणारा नेता हवाय.तेच काम शेखरभाऊ गेली सात वर्षे माण खटाव मतदारसंघातील जनतेलाच आपले कुटूंब मानत करत आहे अन कायम करत राहणार आहे.या कामाला अधिक बळ देण्यासाठी आपण त्यांना साथ द्यावी असे आवाहनही सोनलताई गोरे यांनी केले आहे. यावेळी सौ.सुरेखाताई पखाले यांनीही मनोगत व्यक्त केले.
तुमच्या मुलाला ,भावाला आशीर्वाद द्या..
शेखरभाऊंनी मतदारसंघातील जनतेला आपल कुटूंब समजल आहे. स्वत:च्या कुटूंबाला कमी वेळ देत जनतेसाठी रात्रंदिवस झटत असतात.
कामानिमित्त बाहेर गावी गेल्यानंतर आपल्या जनतेला काही अडचणी येऊ नयेत यासाठी त्यांच्या अनुपस्थितीत सौ.सुरेखाताईंनी यशस्वीपणे जबाबदारी पेलली आहे.कोणतीही सत्ता नसताना तुमच्यासाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी शेखरभाऊंनी ठेवली आहे.त्यांची ताकद वाढवण्यासाठी तुमच्या मुलाला ,भावाला मतांच्या रूपाने आशीर्वाद देत आमदार करा.
- सौ.सोनलताई गोरे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |