सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघाचे लाडके खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी आज दुपारी पिंपोडे बु॥ ता. कोरेगाव येथे सुरु असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या शुटिंगच्या सेटवर भारतीय सिनेमासृष्टितील नावाजलेल्या सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार याची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे अक्षय कुमार मात्र भारावून गेला. एक राजकारणातील, तर दुसरा चित्रपटातील खिलाडी या भेटीमुळे पिंपोडे पंचक्रोशीतील नागरिकांना मात्र सुखद धक्का मिळाला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी पिंपोडे बु॥ परिसरात सुरु असलेल्या जलयुक्त शिवार व वॉटर कप स्पर्धेच्या अनुषंगाने पिंपोडे बु॥ परिसराचा आज दौरा केला होता. त्यावेळी बाजूलाच अक्षय कुमार याच्या 'केसरी' या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु होते. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी आपला मोर्चा थेट चित्रीकरणस्थळी वळवला. उदयनराजेंच्या आगळ्यावेगळ्या आगमनामुळे चित्रपटाच्या सेटवर एकच खळबळ उडाली. जो-तो चित्रीकरण सोडून उदनराजेंच्या बरोबर सेल्फी घेवू लागला. दरम्यान एका कर्मचार्याने उदयनराजे आल्याबाबतची वर्दी अभिनेता अक्षय कुमार याला दिली. लागलीच अक्षय कुमार याने खा. उदयनराजे यांची भेट घेवून अलिंगन दिले. याबाबत दोघांचीही वेगवेगळ्या विषयावर दीर्घ चर्चा झाली. यावेळी अक्षय कुमार म्हणाला, सातारा जिल्हा हा मला प्रथमपासूनच खूप आवडतो. यापूर्वी माझ्या खट्टा-मिठा या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण फलटण येथे झालेले आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये नेहमीच विविध हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. येथील निसर्ग भौगोलिक परिस्थिती चित्रीकरणासाठी अनुकूल आहे. त्यामुळे इथून पुढे माझ्या चित्रपटांच्या शुटिंगसाठी मी सातारा जिल्ह्यासाठी आग्रही असेन. यावेळी खा. उदयनराजे यांनी अक्षय कुमारच्या सामाजिक कार्याबद्दल त्याचे तोंडभरुन कौतुक केले. तसेच जिल्ह्यातील भूमीपुत्रांना या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिलेल्या रोजगाराबद्दलही त्याचे आभार मानले. खा. उदयनराजे भोसले यांनी अक्षय कुमारला आपल्या जलमंदिर पॅलेस येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे. हे निमंत्रण अक्षय कुमारने आनंदाने स्विकारले. दरम्यान, आज दिवसभर खा. उदयनराजे भोसले व अभिनेता अक्षय कुमारच्या भेटीचीच चर्चा सोशल मिडियावर पहावयास मिळत होती.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |