02:46am | Jan 18, 2020 |
सातारा : सातारा पालिकेत वसुलीचा टक्का घटल्याने पुन्हा खाते अंतर्गत बदल्यांचा सोयीस्कर खेळं सुरू झाला आहे. वसुली विभागाच्या हिमाली कुलकर्णी यांना सभा अधीक्षक तर आस्थापना विभागाच्या अरविंद दामले यांना वसुली विभागाची जवाबदारी देण्यात आली आहे.
सभा अधीक्षक अतुल दिसले यांची नगराध्यक्षांचे स्वीय्य सहाय्यक म्हणून जवाबदारी देण्यात आली आहे. मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी गुरुवारी सायंकाळी हे बदलीचे आदेश बजावले. वसुली, आस्थापना, सभा विभाग या संवेदनशील विभागाचा कामाचा समतोल सातत्याने बिघडत आहे.
वसुली विभागाच्या 42 कर्मचाऱ्यांकडून वसुलीचे अंतिम उदिष्ट पूर्ण करून घेणारा खमक्या अधिकारी वसुली विभागाला नसल्याने वसुली अवध्या 41 टक्कयावर येऊन पोहचली आहे. कर्मचारी व अधिकारी यांचे संवादाचे सूर जुळत नाही त्यावर मुख्याधिकारी शंकर गोरे यांचे अजिबात नियंत्रण नसल्याने पालिकेच्या दैनंदिन कामकाजाचा खेळखंडोबा झाला आहे. पालिकेची थकबाकी तब्बल 42 कोटी रूपयांवर पोहचली असून यामध्ये पालिकेच्या इमारतींचे साडेतीन कोटी रुपये कायदेशीर अडचणीमुळे वसूल करण्याची अडचणं झाली आहे. चतुर्थ वार्षिक पाहणीसह वसुलीचे उद्दिष्ट गाठणे हे मोठे कसरतीचे काम झाले आहे. या दैनंदिन कामकाजाच्या अडचणींवर उपाय शोधण्याऐवजी मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी स्वतःच्या बदलीसाठी मंत्रालयात तळ दिला आहे. पालिका अधिनियमं कोळून पिलेल्या अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या म्हणजे उंदीर मांजराचा खेळ झाला आहे. गोरे यांनी पुन्हा गुरूवारी या खेळाचा पुढचा अंक मांडला. आस्थापना विभागाचे अरविंद दामले यांना या विभागासह वसुली विभागाची जवाबदारी देण्यात आली आहे. तर वसुली अधीक्षक हिमाली कुलकर्णी यांना सभा कामकाजाची तर सभा कामकाज पाहणाऱ्या अतुल दिसले यांना नगराध्यक्ष स्वीय सहाय्यक ही जवाबदारी देण्यात आली आहे.
शहर विकास व आरोग्य या मलईदार विभागातील कर्मचारी बरीच वर्ष त्याच विभागात ठाणं मांडून आहेत . शहर विकास विभागाचा आस्थापनेवर बिगारी असणारा कर्मचारी नवीन बांधकाम आराखडयाची छाननी करताना पार्टीला लक्ष्मी दर्शन करायला लावतो . तोच अंक आरोग्य विभागात . ऐंशी सफाई कामगारांच्या नावाखाली मलिदा लाटणाऱ्यांची आरोग्य विभागातून बदली होत नाही . मुख्याधिकारी गोरे यांच्या नियंत्रणाअभावी पालिकेच्या कामाचे पुरते वाटोळे झाले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |