RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

20 June 2019 at 00:05

अनिल देसाई : निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहींची नौटंकी

सातारा : टेंभुच्या पाण्याचा बुडबुडाही माणपर्यंत येऊ शकणार नाही म्हणणा-यांना आम्ही टेंभूचे पाणी माण तालुक्यात आणून दाखवले आहे. आता उत्तर माणला जिहे - कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावांना पाणी मिळण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरू असून सरकार सकारात्मक आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मिटेल. मात्र आता भाजप पाणी देणार म्हटल्यावर निवडणुका डोळ्यापुढे ठेवून काही लोकांची नौटंकी सुरू झाली असल्याची टीका भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केली.

सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या माध्यमातून माणच्या पूर्व भागात टेंभू योजनेचे पिण्यासाठी पाणी आणण्यात यश आले आहे. आता उत्तर माणला जिहे - कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावांच्या पाणी प्रश्नासाठी आपला आणि डॉ. दिलीप येळगावकर यांचा पाठपुरावा सुरु आहे. 

टेंभू योजनेतून माण - खटावला पाणी मिळावे यासाठी आम्ही गेली १६ वर्षे माणच्या जनतेला बरोबर घेवून मोर्चे, आंदोलने करुन संघर्ष केला आहे. डॉ. येळगावकर यांनीही कित्येक वर्षे यासाठी संघर्ष केला. आमच्या या लढ्याला राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून यश मिळायला सुरुवात झाली. टेंभूमधून आज माणच्या १६ गावांना पिण्यासाठी पाणी मिळाले असून महाबळेश्वरवाडी तलाव भरण्याचे काम सुरु आहे. लवकरच खटाव तालुक्यातील मायणी तलावही भरण्यात येणार आहे. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांकडून ही मागणी नव्याने करुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप देसाई यांनी केला.

म्हसवड येथे झालेल्या जाहीर कार्यक्रमात आपण आणि डॉ. दिलीप येळगावकर यांनी पिण्याचे पाणी दिल्याबद्दल आभार मानून आता शेतीसाठी टेंभूमधून पाणी द्या, उत्तर माणचा पाणीप्रश्न मार्गी लावा अशी आग्रही मागणी चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या सूचनेवरून अधिका-यांनी याबाबत प्राथमिक सव्र्हे करुन त्यांच्याकडे खटाव तालुक्यातील २१ आणि माण तालुक्यातील २७ गावे, आटपाडी तालुक्यातील काही गावांना या योजनेमधून पाणी देता येवू शकते, असा अहवाल दिला होता. पुढे उत्तर माणच्या दौ-यावर चंद्रकांत पाटील वडगाव व बिजवडी येथे आले असताना त्या भागातील वारुगडपासून कारखेलपर्यंत शेती पाण्याचा प्रश्न संपवण्यासाठी आपण व लोकांनी मागणी केली होती. त्यावेळी जिहे - कटापूरच्या अधिका-यांना चंद्रकांतदादांनी प्राथमिक अहवाल सादर करण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे आंधळी धरणातून या ३२ गावांना पाणी उचलून उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून देता येऊ शकेल, असा अहवाल जिहे - कटापूरच्या अधिका-यांना केला आहे. त्याप्रमाणे त्याही भागांना पाणी मिळण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु असल्याचे देसाई म्हणाले.

माण - खटावचा पाणी प्रश्न आघाडी सरकारच्या काळात तसाच पडून होता. त्यामुळे हे दोन्ही तालुके विकासापासून वंचित राहिले. आता केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यांचा पाणी प्रश्न मार्गी लागत आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकांकडून हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इतक्या दिवसात त्यांनी या दोन्ही योजनांबद्दल कधी मागणी केली नाही. आताही भाजपच्या सरकारकडेच ते हा प्रश्न मांडत आहेत. भाजपच पाणी प्रश्न सोडवू शकते, याची जाणीव बहुदा त्यांना झाली असावी, असा टोलाही देसाई यांनी यावेळी लगावला.

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before