05:38am | Nov 15, 2018 |
कोरेगाव : संचालक मंडळाच्या बेलगाम व अवैध कर्जवाटप अशा विविध गैरप्रकारामुळे डब घाईला आलेल्या दत्त दिगंबर पतसंस्थेची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असतानाही संस्थेची तातडीने निवडणूक लावून संस्था पुन्हा भ्रष्टाचारी संचालक मंडळाच्या हाती देण्याच्या सहकार खात्याचा डाव असल्याचे संस्थेचे सभासद, ठेवीदार बोलू लागले आहेत .
कोरेगाव शहरात सन पासून सुरू झालेल्या व सुरळीतपणे सुरू असलेल्या दत्त दिगंबर पतसंस्थेमध्ये जिल्ह्यातील अनेक पतसंस्थांचे विलिनीकरण झाल्याने कोरेगाव तालुक्यापुरता असलेला दत्त दिगंबर पतसंस्थेचा कारभार जिल्हाभर वाढला ।दत्त दिगंबर पतसंस्थेच्या संचालक मंडळावर विश्वास ठेवून अनेकांनी आपल्या कष्टाचे, कामाचे, आयुष्यभर कमावलेली पुंजी ,लाखो रुपये ठेवींच्या स्वरूपात पतसंस्थेत ठेवले .परंतु संचालक मंडळाच्या बेलगाम व अवैध कर्ज वाटप अशा विविध गैरप्रकारांमुळे पतसंस्था डबघाईला आल्याचे ठेवीदारांच्या लक्षात आल्याने ठेवीदारांनी आपल्या ठेवी परत मिळविण्यासाठी संचालक मंडळाच्या मागे तगादा लावला. ठेवीदारांचे आक्रमक रूप पाहता हे प्रकरण आपल्या अंगलट येत असल्याचे लक्षता येताचसंचालक मंडळाने पतसंस्थेच्या संचालक मंडळ पदाचा राजीनामा देऊन संस्थेतून काढता पाय घेतला. त्यानंतर तत्कालीन जिल्हा उपनिबंधक यांनी दत्त दिगंबरचे नामकरण दिव्य दत्त दिगंबर करण्यास परवानगी देऊन दत्त दिगंबर पतसंस्थेचा कारभार निवडणूक लावून नवीन संचालक मंडळाकडे सोपविला.
नवीन संचालक मंडळाने संस्था ताब्यात घेतल्यानंतर व संस्थेतील गैरव्यवहार निदर्शनास आल्यानंतर पतसंस्थेचे चेअरमन व व्यवस्थापक यांनी संस्थेचे2011-12ते2015-16 चे फिर लेखा परीक्षणाची मागणी केली .त्यानुसार फिरलेखा परीक्षण म्हणून जिल्हा उपनिबंधक महेश कदम यांनी राणी घायताडे लेखापरीक्षक श्रेणी 1 सं.सं. सातारा यांची नेमणूक केली. परंतु व्यवस्थापक विलास शिंदे यांनी फिर लेखा परीक्षणाची मागणी करून लेखा परीक्षण फी भरण्यास संस्था असमर्थ असल्याचे सांगून फिर लेखा परीक्षण रद्द केले. तसेच काहिंनी नवीन असलेले संचालक मंडळ हे बेकायदेशीर असल्याच्या तक्रारी कमिशनर यांच्याकडे करून नवीन संचालक मंडळ बरखास्त केले. त्यामुळे सहकार खात्याला संस्थेवर प्रशासक नेमणे अपरिहार्य झाले व कोरेगावचे सहाय्यक निबंधकांची संस्थेवर प्रशासक म्हणून नेमणूक केली. दरम्यान पतसंस्थेच्या ठेवीदारांचा व कर्जदारांच्या तक्रारीनुसार सन2011-12 ते सन2015-16 या काळात चुकीच्या पद्धतीने झालेल्या लेखा परीक्षणाची घानती करता सध्याच्या उपनिबंधक श्री. प्रकाश अष्टेकर व जिल्हा विशेष लेखा परीक्षक यांनी सन2011-12ते सन2015-16 या कालावधीचे चाचणी लेखापरीक्षण करण्याचा धाडसी व स्तुत्य निर्णय घेतला व संस्थेच्या चाचणी लेखा परीक्षणासाठी राणी घायताडे लेखा परीक्षक यांची पुन्हा नेमणूक केली .त्यामुळे संस्थेचे लेखापरीक्षक सुरळीत सुरू आहे व त्यामुळे संचालक मंडळाच्या अनेक भानगडी उघडकीस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत .
या सर्व पार्श्वभूमीवर संस्थेची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. संस्थेच्या खातेदारांचे सेव्हिंग खात्यावर असलेले पैसे खातेदारास देण्या करता संस्थेकडे पैसे नाहीत. संस्थेच्या संचालक मंडळाच्या विरोधात उच्च न्यायालयात तसेच कमिशनर यांच्याकडे सुनावणी सुरू आहे. असे असतानाही प्रशासक यांनी संस्थेच्या वसुलीकडे पुरेपूर लक्ष न देता प्रशासक म्हणून नेमणूक झाल्यानंतर लगेच संस्थेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. परंतु हा निवडणूक कार्यक्रमात चुकीच्या पद्धतीने जाहीर झाल्याचे लक्षात येताच सहकार खात्याने तो निवडणूक कार्यक्रम रद्द ठरविला व दि .रोजी दुसरा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. सध्या नामांकन भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे .मतदार यादीत बेकायदेशीर दिलेल्या कर्ज मंजूर केलेल्या व रुपयांच्या थकीत कर्जदारांना जामीन असतानाही त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट केल्याने या निवडणुकीमुळे संस्था पुन्हा एकदा भ्रष्टाचारी संचालक मंडळाच्या ताब्यात देण्याचा सहकार खात्याचा डाव असल्याचे सभासद ,ठेवीदार बोलू लागल्या आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |