02:55am | Feb 09, 2020 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील सीएए, एनपीआर, एनआरसी विरोधी कृती समितीतर्फे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महिलांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले असुन दुसऱ्या दिवशीही ते सुरुच होते. आजही या आंदोलनात अनेक जण सहभागी झाले होते. अनेक मान्यवरांनी धरणे आंदोलन स्थळी येवून पाठिंबा जाहीर केला. एनआरसीविरोधी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.
या धरणे आंदोलनात लेक लाडकी अभियान, नवयान महाजलसा, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, मुक्तीवादी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, जमियात उलेमा ए हिंद, मुस्लिम जागृती अभियान अशा विविध संघटना सहभागी झाल्या असुन हे आंदोलन रोज सुरू राहणार आहे.
केंद्र सरकारच्या नागरिकता विषयक सुधारणा विधेयकाला तसेच राष्ट्रीय नागरिकता नोंदणी ला विरोध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. साताऱ्यातील महिलांनीही आता पुढाकार घेतला आहे. आज या आंदोलनाला भेट देवून पाठिंबा जाहीर करणारयांमध्ये मानवी हक्क चळवळीतले कार्यकर्ते प्रदिप मोरे, ऍड शैला जाधव, प्रा. भास्कर कदम, प्रा. हिंदुराव पवार, शाहीर प्रकाश फरांदे, अमोल बनसोडे, हाजी जमीर मुल्ला, प्रकाश कांबळे, प्रकाश सावंत आदिंचा समावेश आहे.
धरणे आंदोलन यशस्वी करण्यासाठी अनेकजण झटत आहेत. यावेळी एनआरसी हटाव देश बचाव, हिंदू- मुस्लिम- शिख- ईसाई हम सब भाई- भाई, आम्ही भारतीय, आम्ही भारतीय, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |