06:22pm | Apr 09, 2018 |
सातारा : किशोर वयात येत असताना किशोरींची आरोग्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे उपक्रमशील मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जिल्ह्यातील दुर्गम भागासह उर्वरित तालुक्यातील माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनींना येथील राजलक्ष्मी चित्रपटगृहात अक्षय कुमार अभिनित ‘पॅडमॅन’ हा चित्रपट दाखवला.
हा चित्रपट 104 शाळांमधील 470 विद्यार्थीनींनी पाहिला. या चित्रपटामध्ये किशोर वयात आल्यानंतर मुलींनी आरोग्य कसे जपावयास हवे, याबाबत अतिशय उत्कृष्ठपणे जनजागृती करण्यात आलेली आहे. मासिक पाळीच्या वेळी व्यवस्थितपणे आरोग्याची काळजी न घेतल्यामुळे किशोरवयीन मुली तसेच महिलांना अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. असे असताना आपल्याकडे याबाबत अनेक अंधश्रद्धा पाळल्या जातात. त्यामुळे या बुरसटलेल्या परंपरा कोठेतरी संपायला हव्यात, यामुळेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पुढाकार घेवून येथील राजलक्ष्मी चित्रपटगृहात स्पेशल स्क्रिनिंगद्वारे हा चित्रपट दाखविण्यात आला. जिल्ह्यातील दुर्गम भागातून मुलींच्या चेहर्यावर हा चित्रपट पाहिल्यानंतर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी आलेल्या किशोरींनी जिल्हा परिषदेचे आभार मानले. या अनोख्या उपक्रमामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारीही भारावून गेले होते. अनेक मुलींनी चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या भावना प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त करुन आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, उप शिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
104 शाळांमधील 470 मुलींनी पाहिला सिनेमा
‘पॅडमॅन’ हा सिनेमा जिल्ह्यातील 104 शाळांमधील 470 मुलींनी पाहिला. त्यामध्ये जावली (शाळा 5) 19 मुली, कोरेगाव (शाळा 1) 4 मुली, सातारा (शाळा 14) 124 मुली, महाबळेश्वर (शाळा 3) 12 मुली, वाई (शाळा 2) 4 मुली, खंडाळा (शाळा 1) 6 मुली, माण (शाळा 3) 19 मुली, खटाव (शाळा 3) 10 मुली, फलटण (शाळा 13) 105 मुली, कराड (शाळा 8) 39 मुली, पाटण (शाळा 51) 128 मुली यासाठी जिल्हा परिषदेने प्रवासभाड्यासाठी 60 हजार 692 रुपये खर्च केले आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |