04:10pm | Oct 22, 2018 |
सातारा : प्रतापसिंहनगर झोपडपट्टीमध्ये मोकळ्या जागेत शेड बांधल्याच्या कारणावरून दोन गटांत रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राडा झाला. यात एकमेकांवर तलवार व चाकूने हल्ला केल्याने नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मीना सुदाम क्षीरसागर (वय ४०, रा. प्रतापसिंहनगर) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मीना क्षीरसागर यांनी मोकळ्या जागेत शेड बांधले होते. त्यांच्या घराशेजारी राहणारा विशाल अंगद मोरे हा वारंवार शिवीगाळ करत होता. त्यास जाब विचारण्यासाठी गेलेल्या मीना यांच्यावर विशालने तलवारीने वार केला.
त्यावेळी मीना यांच्या कुटुंबातील जवाहर गायकवाड, सुनील सुबराव गायकवाड, सुरेश गायकवाड, सुदाम क्षीरसागर, लता पोडमल, मैना गायकवाड धावत आले. ते सर्वजण भांडणे सोडत असताना त्यांना मीना अंकुश मोरे, बेवा ऊर्फ राजू मंडलिक, अर्चना विशाल मोरे, सोनम राजू मंडलिक, अंगद मोरे यांनी दगड, लोखंडी गजाने मारहाण केली. यात मीना क्षीरसागर यांच्यासह कुटुंबातील आठजण जखमी झाले. तसेच मीना यांच्या गळ््यातील सोन्याचे डोरले गहाळ झाले.
अर्चना विशाल मोरे (वय २०, रा. प्रतापसिंह नगर) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, मीना क्षीरसागर यांनी बांधलेल्या शेडसमोर कचरा टाकल्याच्या कारणावरून मीना हिने शिवीगाळ केली. यावेळी झालेल्या भांडणात अर्चना यांच्या डोक्यात मैना जवाहर गायकवाड हिने लाकडी दांडक्याने मारहाण केली.
जवाहर गायकवाड, सुनील सुबराव गायकवाड, सुरेश गायकवाड, सुदाम क्षीरसागर, लता पोडमल यांनी लोखंडी गज व चाकूने वार केले. यात अर्चना जखमी झाल्या आहेत. तसेच त्यांच्या गळ््यातील मंगळसूत्र गहाळ झाले आहे.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात परस्पराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सहायक फौजदार विष्णू खुडे करीत आहेत.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |