सातारा : तरडफ ता.फलटण येथे काल मध्यरात्री पिराचीपट्टी नावाच्या शिवारात शेळी फार्ममधून शेळ्या चोरणाऱ्या तिघांपैकी एकाला गावातील नागरिकांनी रंगे हात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हि घटना काल मध्यरात्री घडली असून या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वैभव आण्णासाहेब मदने, वय-30, रा.तरडफ ता. फलटण यांचे पिराचीपट्टी नावाच्या शेळी पालनाचा व्यवसाय आहे. काल दि.१८ रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास वैभव मदने यांना गावातीलच अक्षय सदाशिव गायकवाड यांनी फोन वरून तुमच्या शेळी पालन फार्ममधून शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज येत आहे, तसेच फार्मवर कामाला असणाऱ्या पाराजी शिंदे यांच्या घरला बाहेरून कढी लावण्यात आली आहे. अशी माहिती दिली. यानंतर वैभव मदने, नवनाथ गोडसे, विशाल कदम असे तिघेजण शेळी पालन फार्मवर गेले. यावेळी फार्म हाऊसच्या कंपाऊंडची तार तोडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरटे शेळ्या चोरून घेऊन जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा पाठलाग केला. यावेळी चोरटे शेळ्यांसह उसाच्या शेतात लपले. तसेच एका चोरट्याची ग्रामस्थांबरोबर झटापट झाली. परंतु यावेळी तीन चोरटे दुचाकीवरून पळून जाण्याचा यशस्वी झाले.तर एक चोरटा ऊसामध्ये लपून बसला होता. सकाळी सहा वाजता ग्रामस्थ उसाच्या शेतात चोरट्यांचा शोध घेत असताना, दिगंबर नाना जाधव रा. सगुणामाता नगर फलटण हा ऊसामध्ये लपला असता मिळून आला. यावेळी ग्रामस्थांनी या चोरट्याला फलटण ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी त्याने एक शेळी चोरून फरार झालेल्या तीघांची नावे सांगितली आहेत. यामध्ये मुकेश माणिक जाधव, अफसर बबलू इनामदार व राहुल राजेंद्र जाधव सर्व रा. मलटन ता.फलटण येथील रहिवासी आहेत. या प्रकरणी चौघाजणांवर शेळ्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोनि. नितीन सावंत करीत आहेत.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |