06:16pm | Sep 09, 2018 |
सातारा : फलटण, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर या विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये फरारी असलेला सचिन चव्हाण या अट्टल गुन्हेगारास आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने सिनेस्टाईल थरारक पाठलाग करुन गिरवी-फलटण रस्त्यावर झिरपवाडीच्या हद्दीमध्ये पकडले. दरम्यान, विविध गंभीर गुन्ह्यात हवा असणार्या सचिन चव्हाणच्या अटकेमुळे फलटण पोलिसांनी मात्र नि:श्वास सोडला आहे. मात्र या कारवाईत सचिन चव्हाणने झटापटीत दोन कर्मचार्यांच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे ते दोघे जखमी झाले आहेत.
सचिन हनुमंत चव्हाण (वय 33) रा. कुरवली खुर्द, ता. फलटण, सचिन भिसे व सचिन मदने या त्रिकुटाने गेल्या काही वर्षामध्ये वाटमारी, दरोडे, खुनाचा प्रयत्न अशा गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवायांमध्ये उच्छाद मांडला होता. फलटण, सातारा, पुणे ग्रामीण, सोलापूर याठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये या त्रिकुटावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. यापैकी सचिन भिसे याचा काही वर्षांपूर्वी फलटणमध्ये खून झाला होता. तर सचिन मदने अद्याप बेपत्ता आहे. दोन साथीदारांच्या ताटातुटीमुळे सचिन चव्हाण एकटा पडला होता. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्याने स्वत:ची टोळी तयार केली होती. काही महिन्यांपूर्वी सचिन चव्हाण याने उपळवे, ता. फलटण येथील पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तत्कालीन परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांच्या हातावर तुरी देवून तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यामुळे सातारा स्थानिक गुन्हे शाखा, फलटण ग्रामीण व शहर पोलीस ठाणे त्याचा युद्धपातळीवर शोध घेत होते.
दरम्यान आज सकाळी सचिन चव्हाण कुरवली खुर्द या त्याच्या घरी येणार असल्याची माहिती फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी देवानंद तुपे, वाडकर, जगदाळे व अवघडे यांनी त्याला जेरबंद करण्यासाठी परिसरात सापळा रचला होता. तो विंचुर्णी, ता. फलटण येथे दुचाकीवरुन जात असताना डिबीच्या पथकाने त्याचा पाठलाग केला. त्यावेळी त्याने दुचाकी गिरवीच्या दिशेने दामटली. यानंतर पोलीस कर्मचार्यांनीही सिनेस्टाईल त्याचा थरारक पाठलाग केला असता गिरवी-फलटण रस्त्यावर असणार्या अमृता गार्डन या ढाब्यासमोर त्याला पकडण्यात आले. यावेळी सचिन चव्हाण याने पथकातील तुपे व जगदाळे यांच्या अंगावर दुचाकी घालून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला. अशा अवस्थेतही तुपे व जगदाळे यांनी चव्हाणला पकडून ठेवले. यामध्ये तुपे व जगदाळे जखमी झाले. दरम्यान, सचिन चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे फलटण पोलिसांनी मात्र सुटकेचा नि:श्वास सोडलेला आहे. फरार असतानाही सचिन चव्हाण याचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत. सचिनच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास पोलिसांना मदत होणार आहे. तसेच सचिन चव्हाणला पकडणार्या फलटण ग्रामीणच्या डीबी पथकातील कर्मचार्यांना रिवार्ड मिळावे यासाठी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हंकारे यांनी दिली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांनी केली होती मोक्कान्वये कारवाई :
काही वर्षांपूर्वी वडगांव निंबाळकर, ता. बारामती या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध गंभीर गुन्ह्यांच्या सहभागामुळे सचिन चव्हाणवर पुणे ग्रामीण पोलीसांनी मोक्कान्वये कारवाई केली होती. त्यामुळे सचिन चव्हाण बरीच वर्षे कारागृहात होता. मात्र, कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी कारवाया सुरुच ठेवल्या होत्या. राजकीय पाठबळामुळे सचिनवरील गुन्हे खपवून गेले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी पेट्रोल पंप लुटीच्या प्रकरणाने तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता.
सातारा पोलिसांचाही मोक्क्याचा प्रस्ताव
सचिन चव्हाणच्या गुन्हेगारी कारवायांमुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सचिन चव्हाणवर मोक्कान्वये कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. मात्र संदीप पाटील यांच्या बदलीमुळे ती प्रक्रिया काहीअंशी थंडावली होती. मात्र विद्यमान पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सचिन चव्हाणवर मोक्कान्वये कारवाई करावी, अशी मागणी फलटण तालुक्यामधून होवू लागली आहे.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |