11:17pm | Oct 20, 2018 |
कराड : वाहनांची तपासणी करून वाहतुकीसाठी ‘अनफिट' असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मोहिम वाहतूक शाखेने सुरू केली. शनिवारपासून सुरू असलेल्या मोहिमेत 256 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून वाहनधारकांकडून दंड वसुल करण्यात आला. अनफिट वाहनांचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास पाठवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरात वाहनांची संख्या वाढली असून वर्षानुवर्षे आवश्यक त्या तांत्रिक दुरूस्ती न करता वाहने रस्त्यावर फिरत आहेत. विशेषतः प्रवासी वाहतुक रिक्षा, जीप, स्कूल बस, ऍपेरिक्षांचा यामध्ये सामावेश आहे. प्रवासी वाहतूक वाहनांमधून दररोज हजारो प्रवाशी प्रवास करत असतात. वाहने अनफिट असतील तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभुमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशाने कारवाईची मोहिम राबवण्यात आली. शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी नाकाबंदी करत वाहन तपासणीच्या सुचना दिल्या.
त्यानुसार ढेबेवाडी फाटा, मलकापूर फाटा, कोल्हापूर नाका, पोपटभाई पेट्रोलपंप चौक, कृष्णा नाका, सैदापूर, ओगलेवाडी रेल्वे पुल, कार्वे नाका या परिसरात वाहनांची तपासणी मोहिम राबवण्यात आली. प्रत्येक वाहन अडवून वाहन तपासणी केली जात होती. वाहनांची कागदपत्रे तपासून ते वाहन रस्त्यावर चालवण्यासाठी सुयोग्य आहे का?याची ताहणी केली जात होती. जी वाहने नियमावलीत बसत नाही अशा वाहनांची नोंद केली जात होती. त्यांच्यावर कारवाई करून त्या वाहनांच्या नोंदीचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. वाहनांवरील कारवाईच्या मोहिमेने वाहनधारकांची चांगलीच धावपळ उडाली होती. शुक्रवारी दिवसभरात तब्बल 256 वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाहनांचे अपघात रोखण्यासाठी ही मोहिम राबवण्यात येत असून येत्या आठवडाभर वाहन तपासणी मोहिम सुरू राहणार असल्याचे वाहतुक शाखेच्यावतीने सांगण्यात आले.
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |