03:26am | Apr 08, 2019 |
खंडाळा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पांग फेडण्याचे काम खंडाळा तालुक्यातील बोरी गावच्या स्नेहलने केले आहे. राजकारणात पदे येतात आणि जातात पण स्नेहलने प्रचंड कर्तबगारी दाखवत ज्या खडतर परिस्थितीतून जिल्हाधिकारी हे पद प्राप्त केले आहे त्याचे महत्व खूप मोठे आहे. आणि म्हणूनच माळरानावर जन्मलेल्या, वाढलेल्या आणि आपल्या इवल्याशा हातांनी आभाळाला गवसणी घालणाऱ्या या लेकीचा अभिमान वाटतो, गर्व वाटतो. सावित्रीची ही लेक लाखात एक आहे, असे प्रतिपादन किसन वीर उद्योग समूहाचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केले.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कु. स्नेहल धायगुडे देशात १०८ तर राज्यात ७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या यशाबद्दल बोरी, ता. खंडाळा येथील नानासाहेब धायगुडे यांच्या घरी जाऊन स्नेहलचा सत्कार मदनदादा भोसले यांनी केला. या सत्कारावेळी संपूर्ण बोरी गावच आनंदात न्हाऊन निघाल्याचे दिसून आले. मदनदादा भोसले पुढे म्हणाले, स्नेहल आता देशेसेवेसाठी सज्ज झाली आहे. ज्या परिश्रमाने तिने हे यश प्राप्त केलंय ती सोपी आणि सहजसाध्य गोष्ट नाही. सनदी सेवेची कोणतीहि पूर्वपरंपरा नसलेल्या कुटुंबातील, गावातील स्नेहल आहे हे तिच्या यशाचे वैशिष्टय आहे. तिच्या माता पित्यांचेही याबाबत कौतुक, अभिनंदन करावेच लागेल. स्नेहल आता वाडीवस्तीवरील, माळावरीलच काय पण शहरी भागातील तरुणांसाठीही आयडॉल ठरली आहे. हिम्मत, धमक आणि कष्टाची तयारी असेल तर परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी यश कसे प्राप्त करायचे याचा आदर्श स्नेहलने निर्माण केला आहे. म्हणून तिचे यश आभाळाएवढे असून तिचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. यावेळी स्नेहलनेही या सत्काराबद्दल मदनदादा यांना धन्यवाद देत यशाचा प्रवास कथन केला.
विविध रंगांच्या फुलांची ५ फुलरोपे, रामचंद्र गुहा यांचे 'मेकर्स ऑफ इंडिया' हे पुस्तक, शॉल, कंदी पेढे, श्रीफळ देऊन मदनदादा भोसले यांनी स्नेहलचा सत्कार केला. छानशा फुलांनी बहरलेली ती फुलरोपे पाहून खूष झालेली स्नेहल पुस्तकाच्या भेटीने भारावली. मला हे पुस्तक वाचायचेच होते अशी आनंदी प्रतिक्रिया तिने दिली.
यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक नवनाथ केंजळे, वाईचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ खरात, उद्योजक रोहित जगदाळे, बुवासाहेब खरात, सुधीर खरात, जयवंत कचरे, आनंदा काळे, राहुल गोंजारी, बी. बी. धायगुडे स्नेहलचे वडील नानासाहेब आणि आई सौ. वर्षा धायगुडे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |