सातारा : साताऱ्यात पत्रकार परिषदेवेळी कक्षाचे दार लॉक झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार पत्रकारांसह आत अडकून पडले. पंधरा मिनिटांच्या खटाटोपानंतर लॉक तोडून सर्वांची सुटका करण्यात आली. हा किस्सा सुरू असताना 'और चाबी खो जाए' असे मिश्किल उद्गार पवार यांनी काढले.
यातून त्यांच्यातील दिलखुलासपणाचे दर्शन घडले. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर साडेदहाच्या सुमारास रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयातील एका कक्षात खासदार शरद पवार यांची भरगच्च पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेच्या उत्तरार्धात त्या कक्षाचे दार उघडण्याचा प्रयत्न काहीजण करत होते. मात्र कोणी आत येण्याचा प्रयत्न करत असावे असेसर्वांना वाटले. पत्रकार परिषदेवेळी आवाजाचा व्यत्यय नको म्हणून काहीजण आवाज करू नका म्हणून सांगत होते. पण पत्रकार परिषद झाल्यावर दार लॉक झाले असल्याचा उलगडा झाला आणि वातावरणच बदलून गेले. सुरूवातीला थोड्याशा प्रयत्नांनी लॉक निघेल असे वाटले होते.
पण बराच खटाटोप करूनही त्यात यश येत नसल्याचे पाहून खासदार पवार दरवाजाजवळ आले. पत्रकारही तेथे जमले. आत खुद्द शरद पवार व पत्रकार व बाहेर दार उघडण्याचा प्रयत्न करणारे अस्वस्थ चेहरे असे दृश्य होते. पण दार उघडण्याचे प्रयत्न सुरू असताना खासदार पवार यांनी 'और चाबी खो जाए' असे मिश्किलपणे म्हणत आपल्यातील मिश्किलपणाचा प्रत्यय आणून दिला. शेवटी दारावर बाहेरून लाथा घालून दार तोडण्याचा प्रयत्न झाला. त्यातही अपयश आल्यानंतर लॉक तोडण्याचा प्रयत्न झाला. सुमारे पंधरा मिनिटांच्या प्रयत्नांनंतर लॉक काढण्यात यश आले आणि खासदार पवार यांच्यासह पत्रकारांची सुटका झाली. सकाळी अकरा ते सव्वाअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |