कराड : जखीणवाडी (ता.कराड) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक शेळी जागीच ठार झाली. मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्वप्नील भिंगारदेवे यांच्या गोशाळेत ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, जखीणवाडी, ता. कर्हाड येथे स्वप्नील भिंगारदेवे यांची गोशाळा आहे. गोशाळेच्या शेजारी असलेल्या एका शेतकर्याने सोयीसाठी म्हणून आपली एक शेळी भिंगारदेवे यांच्या गोशाळेत मंगळवारी रात्री बांधली होती.
रात्री दीड वाजण्याच्या सुमारास गोशालेतील कामगारास गायींचा हंबरडा सुरू असलेला ऐकू आला. यानंतर कामगाराने त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता बिबट्याने शेळीवर हल्ला करून तिला ठार मारल्याचे त्याच्या निदर्शनास आले. कामगाराने आरडाओरड करण्यास सुरूवात केली. तसेच परिसरातील नागरिकांना बोलविले.
नागरिकांसह सर्वांनी फटाके वाजविले. फटाक्यांच्या आवाजाने बिबट्या त्या ठिकाणाहून पळून गेला. या घटनेमुळे जखीनवाडी पसिरातील शेतकरी, ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |

वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |