12:05am | Apr 07, 2020 |
सातारा : निझरे, ता. जावली येथील मुंबईमध्ये टॅक्सी चालक असलेली 54 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या परिवारासह गावातील त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही जिल्हा प्रशासनाने क्वारंटाईन केले होते. यावेळी अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने कालच पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. दरम्यान, आज दुपारी त्या कोरोना बाधित व्यक्तीच्या मुलाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली असून जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 5 झाली आहे.
देशात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. सातारा जिल्ह्यालाही कोरोनाचा विळखा आवळत चाललेला आहे. काल मूळचा निझरे, ता. जावली येथील असलेला 54 वर्षीय व्यक्ती गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये टॅक्सी चालक होता. देशात कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेवून संबंधित व्यक्ती 8 मार्च रोजी मुंबई येथून निझरे येथे आला होता. परंतू 28 दिवसांमध्ये त्याच्यामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नव्हती. परंतू मागील दोन-तीन दिवसांपासून त्याला कोरोनासदृश्य लक्षणे जाणवायला लागल्यानंतर त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुणे येथील एनआयव्ही कडे पाठविण्यात आले होते. काल रविवारी त्याच्या तपासणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे जावली तालुक्यासह जिल्ह्यातही खळबळ उडाली होती. दरम्यान, त्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या परिवारासह संपर्कात आलेल्या लोकांनाही जिल्हा प्रशासनाने तत्काळ क्वारंटाईन केले होते. त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुनेही पुणे येथील एनआयव्ही कडे पाठविण्यात आले होते. आज दुपारी ते रिपोर्ट रुग्णालय प्रशासनाला प्राप्त झाले असून त्या कोरोना बाधिताचा 22 वर्षाचा मुलगाही कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या दोघांसह जिल्ह्यातील एकूण 5 कोरोना बाधित रुग्णांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |