कराड : किल्ले सदाशिवगड संवर्धनासाठी कार्यरत असणार्या सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानकडून मंगळवारी सकाळी गडावर मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेल्या पोलिस अधिकार्यांसह लष्करी जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुंबईवरील भ्याड हल्ल्यास 11 वर्ष पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यात पोलिसांसह लष्करी जवानांनी प्राणाची आहुती देत देशवासियांचे संरक्षण केले. त्यामुळेच 26 नोव्हेंबर हा पोलिस दलासाठी प्रेरणा दिवस असल्याचे आपण मानतो, असे प्रतिपादन पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी केले.
यावेळी राज मेडिकलचे मालक सलीम मुजावर, नॅशनल स्पोर्टस्चे कैलास कदम, बाबासोा पवार, सर्जेराव पाटील, राजेंद्र काटवटे, हजारमाचीचे उपसरपंच पोपट साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य सतीश पवार, पत्रकार सुभाष देशमुखे यांच्यासह सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे सदस्य, गडप्रेमी नागरिक उपस्थित होते.
प्रारंभी पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव, सलीम मुजावर, कैलास कदम यांच्यासह गडप्रेमी नागरिकांकडून शहिदांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना पोलिस उपअधीक्षक सुरज गुरव यांनी मुंंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शेकडो निष्पान नागरिकांचा बळी गेला. शेकडो लोक जखमी झाले होते. नागरिकांचे प्राण वाचवताना पोलिस अधिकारी तसेच जवानांनी कशाचीही पर्वा केली नाही. त्यामुळेच पोलिस दलासाठी हा प्रेरणा दिन आहे. दहशतवाद्यांशी लढताना ज्या पद्धतीने पोलिस अधिकारी, जवान यांनी पराक्रमाची शिकस्त करत एका दहशतवाद्यास जिवंत पकडण्यात यशही मिळवले होते. त्यामुळेच पोलिस दलाकडे पाहण्याचा सामान्यांचा द़ृष्टीकोन बदलला असल्याचीही भावना सुरज गुरव यांनी व्यक्त केली.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |