गोखळी : महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापुर च्या कुशीत वसलेल्या फलटण पासुन 18 कि.मी.अंतरावर फलटण -पंढरपूर महामार्गावरील फलटण पूर्व भागातील बरड ग्रामपंचायतीचे अंतर्गत असलेल्या सुमारे बाराशे लोकसंख्या असलेल्या बागेवाडी मध्ये हिंदूच मोहरम निमित्ताने 'ताबुत 'मिरवणुक काढून उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.
अंत्यत छोट्याशा लोकसंख्येच्या बागेवाडी मध्ये मुस्लिम बांधवांचे एक सुध्दा कुटुंब नाही. पण पूर्व परंपरागत अनेक वर्षापासून हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.ताबूत चा मान गावातील श्री. पिराजी भैयाजी शिंदे वयोवृद्ध 90 वर्षांचे असुन त्यांच्या अगोदर वडीलांच्या कडे मान होता. यांच्या घराण्यात गेल्या अनेक वर्षापासून आहे. यामध्ये गावातील रामोशी, मराठा,माळी, धनगर समाजातील सर्व समाज बांधव सहभागी होतात. नवसाला पावणारा सण म्हणून मोठ्या श्रद्धेने दिवसांपासून मोहरम निमित्ताने ताबुत आदल्या दिवशी तयार करून रितीरीवाज प्रमाणे पुजा करून दुसरे दिवशी 'ताबूत'ची मोठी मिरवणुक काढण्यात येते.ताबूत उत्सव साजरा करण्यात येत असल्याने कोणत्याही अर्नथ घटना गावात घटत नाहीत गावची दिवसांदिवसांपासून प्रगती होत आहे अशी ग्रामस्थांची श्रध्दा आहे. या उत्सवामध्ये यामध्ये गावातील तरुण युवकांच्या पासून जेष्ठ नागरीक, महिला, लहान मुले सहभागी होतात पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणुक काढण्यात येते..या उत्साहास बागेवाडी आणि पंचक्रोशीतील पाच-सहा गावातील नागरीक उपस्थित राहतात गतवर्षी नवसाला बोलल्या प्रमाणे नारळाचे तोरणे बांधली जातात तर काही ताबुत बांधतात. .दरवर्षी नारळांच्या तोरणांची संख्येत वाढ होत आहे. तोरणासाठी जमलेले नारळ विक्री न करता दुसरे दिवशी प्रत्येक घरी प्रसाद म्हणून वाटप करण्यात येते . ताबूत मिरवणुक गावातील प्रमुख मार्गावरून काढून नंतर ताबुत विर्सजन करण्यात येते असा पध्दतीने हिंदू -मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून या सणाकडे पाहिले जाते .
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |