RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

देशद्रोहाच्या प्रकरणात वायको दोषी, एक वर्षाची शिक्षा

05 July 2019 at 18:11

चेन्नई : देशद्रोहाच्या प्रकरणात एमडीएमकेचे नेते वायको हे दोषी ठरले आहेत. याप्रकरणात चेन्नईच्या एका न्यायालयाने त्यांना एक वर्षाची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मात्र वायको यांच्या विनंतीनंतर कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने वायको यांचा राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

२००९मध्ये चेन्नईत एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यावेळी देशाविरोधी भाषण केल्याचा वायकोंवर आरोप आहे. श्रीलंकेतील अंतर्गत युद्धावर भाषण देताना वायको यांनी दहशतवादी संघटना एलटीटीईचं समर्थन केलं होतं. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्यावर सुनावणी झाली असता कोर्टाने याप्रकरणी वायकोंना दोषी ठरवले. शिक्षा सुनावल्यानंतर वायकोंच्या वकिलांनी कोर्टात याचिका दाखल करून शिक्षेला स्थगिती देण्याची विनंती केल्यानंतर कोर्टाने आपल्याच निर्णयाला स्थगिती दिली आहे. 

'चांद्रयान-२' झेपावलं; 'इस्रो'ने घडवला इतिहास

जगभरातील सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेल्या आणि अवघ्या जगाचं लक्ष लागलेल्या 'चांद्रयान-२' बाहुबली रॉकेटच्या मदतीने आज अखेर अंतराळात झेपावलं.

3 hours before

दाबोळी विमानतळावर 56 लाख 38 हजारांचे सोने जप्त

दाबोळी विमानतळावर रविवारी 56 लाख 38 हजार रुपये किमतीचे 1 किलो 787 ग्रॅम वजनाचे सोने जप्त करण्यात आले आहे. कस्टम खात्याच्या गोवा विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवीईत ताजिकीस्तानच्या तिघा महिलांना ताब्यात घेतले.

13 hours before

माजी मुख्यमंत्री काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झाल्याने दिल्लीत दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

21 July 2019 at 02:42

स्मार्ट टीव्ही हॅक करुन बनवला पती-पत्नीच्या खासगी क्षणांचा व्हिडीओ

देशात सायबर क्राईमचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज सायबर क्राईम विभागा अंतर्गत वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद होत आहे.

20 July 2019 at 16:28