02:46am | Sep 11, 2019 |
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे युवा नेते धैर्यशिल कदम यांना शिवसेनेने पक्षात येण्याची ऑफर दिली असुन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा.नितीन बानुगडे पाटील व हातकणंगले मतदार संघाचे खासदार धैर्यधिल माने यांनी युवा नेते धैर्यधिल कदम यांची पुसेसावळी येथील निवासस्थानी भेट देऊन कराड उत्तर विधानसभा मतदार संघाच्या चालू राजकीय घडामोडीवर सविस्तर चर्चा केली.
शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केले असुन सातारा जिल्हयातील पूर्वीप्रमाणेच जागा वाटपावर शिवसेना ठाम आहेत यामुळे कराड उत्तर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच उमेदवार असणार यावर शिक्का मोर्तब झाले आहे, आज कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा.नितीन बानुगडे पाटील व खासदार धैर्यशिल माने यांनी धैर्यशिल कदम यांच्याशी 2 तास चर्चा केली.
भाजपा शिवसेना महायुतीवर शिक्का मोर्तब झाले असुन 135 जागा शिवसेना लढवणार आहे सातारा जिल्ह्यातील कराड उत्तर सह 6 जागा शिवसेनेने दावा सांगीतला असुन कराड उत्तर विधानसभा मतदार संघात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा.नितीन बानुगडे पाटील यांनी मतदार संघ शिवसेनेकडेच राहणार असल्याचा दावा केला होता.दरम्यान गेल्या निवडणुकीत 58 हजार मतदान मिळवून दोन नंबरची मते मिळवणारे धैर्यधिलदादा कदम यांनी कराड, सातारा, कोरेगाव व खटाव या 4 तालुक्यात वर्धन ग्रूप च्या माध्यमातून मोठे संघटन तयार केल्याने शिवसेनेने धैर्यशिल कदम यांना शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिले आहे.
गेल्या 15 दिवसापासुन कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अनेक घडामोडी घडत असुन विदयमान आमदार बाळासाहेब पाटील यांच्याबाबत मोठी नाराजी आहे युवा नेते धैर्यशिल कदम यांना महायुतीच्या उमेदवारी मिळण्यासाठी मतदारसंघातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यानी मागणी केली आहे. वर्धन अग्रो चे चेअरमन धैर्यशिल कदम यांना शिवसेनेचे नेत्यांनी भेट देऊन शिवसेनेत येण्याचे निमंत्रण दिल्याने कराड उत्तर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार म्हणुन ते समोर येत आहेत. शिवसेनेने दिलेल्या ऑफर बाबत धैर्यशिल कदम काय निर्णय घेणार हे आता येत्या 13 तारखेच्या निर्धार मेळाव्यानंतर समजणार आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |