कराड : कराड शहराचे प्रवेशद्वार असणार्या कोल्हापूर नाक्यावर दोनच दिवसांपूर्वी भरघाव कंटेनरने धडक दिल्याने त्याखाली चिरडून एका चिमुकलीला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर महामार्गावरील बेदरकार वाहन चालकांच्या चुकांमुळे होणार्या अपघांताना आळा बसावा, यासाठी महामार्ग पोलिसांच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या इंटरसेप्टर वाहनाचा प्रवेश झाला आहे. अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांच्या हस्ते नुकताच या वाहनाच्या वापराचा आंरभ करण्यात आला.
महामार्ग पोलीस पुणे विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय गाढवे, पोलीस उपनिरीक्षक अशोक जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील प्रमुख उपस्थित होते. इंटरसेप्टर वाहनांमध्ये बसवण्यात आलेल्या उपकरणांचा वापर कसा करावा, याबाबत कराड येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रामध्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हातील 9 अधिकारी आणि 50 पोलीस कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्यात आले. साहाय्यक पोलीस निरीक्षक अस्मिता पाटील यांनी या वाहनांमध्ये लेसर स्पीड डिवाइस कॅमेरा, ब्रेक आनालायझर,टिन्ट मीटर इत्यादी आधुनिक तांत्रिक उपकरणे बसवण्यात आलेली आहेत. महामार्गावर वाढत्या अपघांताना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली 18 ऑक्टोबरपासून महामार्ग पोलीस महामार्गावर अतिवेगाने चालणारी वाहने, दारु पिऊन चालवणे, विना हेल्मेट वाहन चालवणे तसेच वाहनांना बसविण्यात आलेल्या काळया काचांवर मोठया प्रमाणावर कारवाई करणार आहेत, असे सांगितले.
या केसेस ऑनलाइन पध्दतीने करण्यात येणार असल्याने त्याचे चलन गाडी नंबरवर केले जाणार आहे. त्यासाठी गाडी थांबवण्याची गरज लागत नाही. त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवताना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, दुचाकी चालवताना हेल्मेट वापरावे आणि सर्व्हिस रोडचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग पोलीसांनी केले आहे.
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |

महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |
माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे : शशिकांत शिंदे |