06:24pm | Mar 27, 2018 |
सातारा : सातारा जिल्ह्यातील पहिले विश्वासार्ह न्यूज पोर्टल ‘सातारा टुडे’ वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या वर्धापनदिन विशेषांकाचे आज दि. 27 रोजी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या दर्जेदार विशेषांकाचे संदीप पाटील यांनी विशेष कौतुक करुन ‘सातारा टुडे’ला शुभेच्छा दिल्या.
‘व्हाईस ऑफ सातारा’ ही बिरुदावली गेली सहा वर्षे जोपासणारे ‘सातारा टुडे’ने अल्पावधीतच कोट्यवधी वाचकांची मने जिंकलेली आहेत. व्यवसायाच्या निमित्ताने राज्यात, देशात व परदेशात विस्थापित झालेल्यांसाठी हक्काचे व्यासपीठ असलेले ‘सातारा टुडे’ हे सातारा जिल्ह्यातील पहिले आणि विश्वासार्ह न्यूज पोर्टल सातारा जिल्ह्यासह राज्यभरात ओळखले जाते. गेली सहा वर्षे अव्याहतपणे ‘सातारा टुडे’ने निर्भिडपणे शोषित, वंचितांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. दरवर्षी ‘सातारा टुडे’ आपला वर्धापन दिन साजरा करतो. याहीवर्षी ‘सातारा टुडे’च्या सहाव्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त वर्धापन दिन विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला होता. 32 पानांचे संपूर्ण रंगीत स्वरुपातील दर्जेदार लिखाणासह हा अंक वाचनीय झाल्याची पोचपावती पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी ‘सातारा टुडे’चा वर्धापन दिन विशेषांक प्रसिद्ध करतेवेळी दिली.
यावेळी संदीप पाटील म्हणाले, इंटरनेटच्या युगामध्ये मोबाईलमुळे प्रत्येक माणूस हा फास्ट ट्रॅकवर आलेला आहे. मोबाईलमुळे सर्वच क्षेत्रात कधी नव्हे अशी फार मोठी क्रांती घडलेली आहे. माध्यम क्षेत्राचा विचार केल्यास यामध्येही फार मोठे अमूलाग्र बदल झालेले आहेत. प्रिंट मिडियाने कालानुसार कात टाकलेली आहे. प्रत्येक दैनिक आज ऑनलाईन झालेले आहे. आजची बातमी आजच वाचणे हा ट्रेंड आहे. कालानुरुप छापील माध्यमांनीही यामध्ये बदल केलेला आहे. ‘सातारा टुडे’ हे गेल्या सहा वर्षापासून चांगल्या पद्धतीने वृत्तांकन करीत आहे. गेल्या दोन वर्षात ‘सातारा टुडे’ने वस्तुनिष्ठ वार्तांकन केलेले आहे. त्यामुळे पोलीस दलालाही ‘सातारा टुडे’चा फायदा झालेला आहे. शोषित आणि वंचितांचा ‘सातारा टुडे’ हा खर्या अर्थाने आवाज आहे. जिल्ह्यातील अवैध सावकारी असो, किंवा इतर सामाजिक प्रश्न असोत ते ‘सातारा टुडे’ने निर्भिडपणे मांडलेले आहेत. भविष्यातही ‘सातारा टुडे’च्या प्रगतीची कमान अशीच चढत राहो, अशा शुभेच्छा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी ‘सातारा टुडे’चे संपादक संग्राम निकाळजे यांना दिल्या. यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ‘सातारा टुडे’चे विनित जवळकर, अतुल गोडसे, उद्योजक बाळासाहेब इथापे, विक्रांत शिर्के, नितीन निकाळजे, विशाल निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |