वाई : महाबळेश्वरजवळ विषारी औषधाचा वापर करून बिबट्याची हत्या करून त्याची नखे काढून घेतल्या प्रकरणी वन विभागाने चारजणांना अटक केली आहे. त्यांच्या कडून वन विभागाने बिबट्याची १८ नखे, एक कोयता व मृत बिबटयाचे अवशेष हस्तगत केले आहेत. न्यायालयाने चारही आरोपींची पाच दिवसांच्या वन कोठडीत रवानगी केली आहे.
१३ जानेवारी रोजी घोनसपूर (ता महाबळेश्वर) येथील बापु रखमाजी जंगम यांच्या गाईवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात गाई ठार झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरून बापु जंगम याने घरा जवळील जंगलात विषारी थायमेट हे औषध टाकले होते. त्या विषारी औषधामुळे बिबट्याचा मृत्यु झाला होता. १५ जानेवारी रोजी बापु जंगम व अन्य तीन साथीदार यांनी या मृत बिबट्याची सर्व १८ नखे कोयत्याने तोडुन काढली. त्यातील बापु याने सहा नखे स्वतः घेतली व इतर तिघांना प्रत्येकी तीन तीन नखे दिली. मृत बिबटयाचे उरलेले अवशेष त्या चौघांनी जवळच्या जंगलात पुरून ठेवले. याबाबत वन विभागाला माहीती मिळाली असता त्यांनी या प्रकरणाची अधिक चौकशी केली. या चौकशीमध्ये तथ्य आढळुन आल्याने वन विभागाने बिबट्याच्या शिकार प्रकरणी संभाजी सदाशिव जंगम, बापु रखमाजी जंगम, पांडुरंग कृष्णा जंगम व शिवाजी धांडीराम जंगम सर्वजण रा. घोणसपुर ता. महाबळेश्वर यांना वन्यजीव अधिनियम कायद्यानव्ये अटक केली. आज या सर्व आरोपिंना न्यायालया समोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणाची सर्व कारवाई उपवनसंरक्षक भारतसिग हाडा, सहा उपवनसंरक्षक व्ही बी भडाळे, यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे, वनपाल एस एम शिंदे, एस के नाईक, वनरक्षक ज्योती घागरे दिपक सोरट, आशिष पाटील, रोहीत लोहार, सहदेव भिसे, लहु राउत, विश्वभंर माळझरकर, मुकेश राउळकर, माधव ताटेवाड, आकाश कुंभार, विदया घागरे. वनपाल एस. के. शिंदे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |