RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

“तुम्ही येथे फसवणूक करण्यासाठी येता ? मी तुम्हाला संपवून टाकेन

13 August 2019 at 14:46

जिल्हाधिकाऱ्याची पोलीस अधिकाऱ्याला धमकी

कांचीपुरम : प्रशासकीय अधिकारी एका पोलीस अधिकाऱ्याला धमकावत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंदिरात आलेल्या भक्तांना व्हीआयपी गेटमधून आत सोडत असल्याने जिल्हाधिकाऱ्याने थेट पोलीस अधिकाऱ्यालाच धमकी दिली. तामिळनाडूमधील कांचीपुरम जिल्ह्यातील वरदराजा पेरुमल मंदिरात हा प्रकार घडला आहे.

“तुम्ही येथे फसवणूक करण्यासाठी येता? मी तुम्हाला संपवून टाकेन. तुम्ही काय तपासणी करत आहात ? अनेकजण विना पास जात आहेत. जेव्हा व्हीयआपी येतात, तेव्हा मुर्खासारखे उभे राहतात. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आणि महत्त्वाचे नेते येत आहेत. तू आता संपलास. आजच निलंबन करतोय मी”, अशी धमकी दिल्यानंतर जिल्हाधिकारी पी पोन्निया पोलीस अधिकाऱ्यावर जोरात ओरडत संताप व्यक्त करताना या दोन मिनिटांच्या व्हिडीओत दिसत आहे.

पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिल्यानंतर जिल्हाधिकारी तेवढ्यावरच थांबले नाहीत तर राज्य पोलीस उद्धट असल्याची टीका करण्यास सुरुवात केली. “तुम्ही पोलीस कर्मचारी उद्धट असता. तुमचे महानिरीक्षक कुठे आहेत ? त्यांना यायला सांगा. निलंबित करा”, असं जिल्हाधिकारी सांगतात.

यावेळी पोलीस अधिकारी वारंवार विनंती करत आपली बाजू सांगण्याचा प्रयत्न करतो. मात्र जिल्हाधिकारी त्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडतात. पोलीस अधिकारी वारंवार माफी मागत असताना जिल्हाधिकारी मात्र काहीही ऐकून घेत नाहीत.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिरात भक्तांना मोठ्या संख्येने व्हीआयपी गेटमधून प्रवेश दिला जात असल्या कारणाने जिल्हाधिकारी नाराज झाले होते. मात्र पोलिसांनी सांगितल्यानुसार, व्हिडीओत दिसणारे पोलीस निरीक्षक रमेश यांनी फक्त एका वयस्कर दांपत्याला त्रास होऊ नये यासाठी तेथून जाण्याची परवानगी दिली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी पातळी ओलांडल्याचं म्हटलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना व्यवस्थित काम सुरु नसल्याने आपला संताप झाला असं सांगितलं आहे. “जिल्हास्तरीय अधिकारी आणि पोलीस एक टीम म्हणून काम करतं. माझा पोलीस खातं किंवा एखाद्या अधिकाऱ्याविरोधात अजिबात रोष नाही”, असं त्यांनी सांगितलं आहे.


माजी केंद्रीय अर्थमंत्री, ज्येष्ठ भाजप नेते अरुण जेटली यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते, प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश

24 August 2019 at 16:23

अखेर चिदंबरम अटकेत

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी दिवसभराच्या नाट्यपूर्ण घडामोडींनंतर रात्री दहा वाजता सीबीआयने अटक केली. अटक टाळण्यासाठी चिदंबरम यांनी दिवसभर प्रयत्न केले.

22 August 2019 at 14:18