RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पाक सीमेवर अदृश्य भिंत, दहशतवादी अडकणार

14 September 2018 at 18:07

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी भारताने आता सीमेवर 'इलेक्ट्रॉनिक भिंत' उभी केली आहे. जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर प्रथमच हायटेक सर्व्हीलन्स सिस्टिम उभारण्यात आली आहे. याच्या मदतीने जमीन, पाणी आणि हवेत एक अदृश्य इलेक्ट्रॉनिक बॅरियर उभरण्यात आले आहे. यामुळे सीमा सुरक्षा दला (BSF)ला घुसखोरांना ओळखण्यास आणि कठीण ठिकाणांवरील घुसखोरी रोखण्यास मदत मिळणार आहे. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह सोमवारी जम्मूतील अशा दोन पथदर्शी प्रकल्पांचे उदघाटन करणार आहेत. एका प्रकल्पानुसार जम्मूतील ५.५ किमी सीमेवर देखरेख ठेवता येऊ शकते. या प्रणालीला कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्टीग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम (CIBMS) असं नाव देण्यात आलं आहे. 

असं काम करेल CIBMS यंत्रणा 

पाकमधून कायम रात्रीच्या वेळी दुर्गम भागातून भारतीय सीमेत घुसखोरी होते. अशा ठिकाणी CIBMS यंत्रणा उभारून अनेक आधुनिक सर्व्हीलन्स तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. यात थर्मल इमेजर, इन्फ्रारेड आणि लेझर बेस्ड इन्ट्रुडर अलार्म सुविधा असतील. यानुसार जमिनीवर अदृश्य कुंपण, हवाई टेहळणीसाठी विमान आणि जमिनीखाली सेन्सर लावलेले असतील. यामुळे घुसखोरीचा कुठलीही हालचाल टिपली जाईल आणि सुरक्षा दलांना तात्काळ सतर्क करेल. 

भुयार खोदले तरी पकडले जातील दहशतावदी 

दहशतवादी जमिनीखाली भुयार खोदून भारतीय सीमेत घुसखोरी करतात. पण आता दहशतवाद्यांना हे शक्य होणार नाही. भूयार रेडार आणि सोनार सिस्टिममुळे नदी पात्रालगतची सीमा सुरक्षित केली जाईल. सर्व माहिती रिअल टाइममध्ये म्हणजे प्रत्येक क्षणाची माहिती तात्काळ कळत जाईल. यामुळे सुरक्षा दलांना दहशतावाद्यांची घुसखोरी रोखता येईल. 

सीमेवरील पहिलाच प्रयोग 

इन्टीग्रेटेड बॉर्डर मॅनेजमेंट सिस्टिम (CIBMS) वरील अदृश्य भिंत (व्हर्च्युअल फेन्स) हा भारताचा पहिलाच प्रयोग आहे. प्रत्यक्ष जाऊन नजर ठेवता येणार नाही अशा दुर्गम भागाच्या सुरक्षेसाठी ही CIBMS यंत्रणा तयार केली गेली आहे. मग ती जमिनीवरील असो की नदीलगतची सीमा. 

- तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरक्षा दलांची शक्ती वाढणार आहे. मनुष्यबळ, शस्त्रास्त्र आणि अत्याधुनिक सर्व्हीलन्स उपकरणांच्या मदतीने सीमेवरील सुरक्षा अभेद्य केली जाईल. 

सुरक्षेचे नवीन नेटवर्क 

घुसखोरीच्या घटनांचा आढावा घेतल्यानंतर दोन भाग यासाठी निवडण्यात आले आहेत. येत्या सोमवारी तिथे ही नवी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत होईल. इन्फ्रारेड आणि लेझर बेस्ड इन्ट्रुजन डिटेक्टर्स हे जमीन आणि नदीलगतच्या परिसरावर अदृश्य भिंतीचे काम करेल. सोनार सिस्टिम नदीतून होणारी घुसखोरी रोखेल. अॅरोस्टेट टेक्नॉलॉजी हवेतून टेहळणी करेल. तर जमिनीखालील सेन्सर्स भुयारातून होणाऱ्या घुसखोरीवर सतत देखरेख ठेवतील, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली. 

 

छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्‍ला; ४ जवानांसह ६ जखमी

छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी पुन्‍हा एकदा सुरक्षा दलांना निशाणा केले. बिजापूरपासून काही अंतरावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्‍फोटात सीमा सुरक्षा दलाचे ४ जवान तसेच इतर दोघेजण या हल्‍ल्यात जखमी झाले.

6 hours before

जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील टीकून गावामध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

10 November 2018 at 15:38

सिलिंडरच्या किंमतीत दुसऱ्यांदा वाढ

घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत चालू महिन्यात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. या सिलिंडरच्या किंमतीत शुक्रवारी दोन रुपयांची वाढ घोषित करण्यात आली.

10 November 2018 at 14:43

फैजाबादचं नाव आता अयोध्या

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी फैजाबाद जिल्ह्याचे नाव बदलून अयोध्या केले आहे. अयोध्येतील दीपोत्सव कार्यक्रमादरम्यान फैजाबादच्या नामांतरासोबत आणखी काही महत्वाच्या घोषणा योगींनी केल्या.

07 November 2018 at 15:24