01:36am | Sep 01, 2018 |
कराड : रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील चिकुन गुनिया व डेंग्यू सदृश्य रूग्णांची संख्येत वाढ होत असल्याने आरोग्य विभागाने गुरूवार व शुक्रवारी दोन दिवसात सुमारे २००० घरांचा सर्व्हे केला. या सव्र्हेत घरोघरी डासांची अंडी व आळ्या आढळून आल्या आहेत. आरोग्य विभागाने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या आकरा रक्त नमुन्यांपैकी चार रक्त नमुने पॉझिटीव्ह आल्याने रेठरे बुद्रुक गावाला चिकुन गुनिया आजाराची साथ असल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले. दरम्यान, ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत असून त्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी केले.
पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या रेठरे बुद्रुक येथील ११ रक्त नुमन्यांपैकी चार नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. शिवाय चिमुन गुनिया व डेंग्यूची लक्षणे असलेल्या रूग्णांमध्ये वाढच होत असल्याने आरोग्य विभागाने रेठरे बुद्रुकला चिकुन गुनिया आजाराची साथ असल्याचे शुक्रवारी जाहीर केले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोरबू यांनी दिली. यापार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथील स्वच्छता व आरोग्य सुविधांचा आढावा घेतला.
रेठरे बुद्रुकमध्ये जुलै महिन्यापासून ग्रामस्थांना चिकुन गुनिया व डेंग्यू सदृश्य साथीच्या आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. गावातील अनेक ग्रामस्थांना ताप, सांधेदुखी, उलटी मळमळ आदी त्रास होऊ लागल्याने येथील प्रा. आ. केंद्रात प्रथमोपचार घेतले. तर अनेक रूग्णांनी खाजगी दवाखान्याची वाट चोखळली. यापूर्वीच येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या ७५ वर्षीय रूग्णाच्या रक्त नमुन्यात चिकुन गुनियासह डेंग्यूची टेस्ट आणि १५ वर्षीय मुलीची डेंग्यू टेस्ट पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले होते. तर आतापर्यंत ११ रूग्णाच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुण्याला एनआयव्हीकडे पाठवण्यात आली होती.
मात्र, बुधवार दि. २९ आगस्टपासून सांधेदुखी व तापाने बाधीत नवीन २५ रूग्ण येथील प्रा. आ. केंद्रात उपचारासाठी दाखल झाले. त्यामुळे ही साथ बाळावत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. हिवताप विभागाच्या जिल्हाप्रमुख जंगम, उपजिल्हा आरोग्य अधिकारी फाळके यांच्यासह हिवतापाचे मच्छर पकडणारे पथकाने गावात डासांची अंडी व आळ्या पाहून त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती.
आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांचे सहकार्य मिळत नसल्याने साथ अटोक्यात आणण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. सरपंच सुवर्णा कापूरकर, उपसरपंच शिवाजी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शरद बागडे, ग्रा. प. सदस्यांसह आरोग्य अधिकारी डॉ. मैथिली मिरजे, डॉ. अनिता कदम यांच्यासह ग्रा. पं. सदस्यांनी स्वच्छतेचे आवाहन केले. यावेळी पंचायतीकडून मच्छर निमिर्तीचे होऊ शकते, अशा ठिकाणची पाहणी करून तातडीने त्या परिसराची स्वच्छता हाती घेण्यासह संबंधित कचऱ्याची विल्लेवाट लावण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पंचायतीने स्वच्छतेच्या कामाला गती दिली आहे.
सोमवारी आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक :
रेठरे बुद्रक व तांबवे या प्राथमिक आरोग्य केंद्र असलेल्या गावांमध्येच चिकून गुनिया व डेंग्यू या साथीच्या आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत. पार्श्चभूमीवर कराड पंचायत समितीच्या सभागृहात सभापती फरिदा इनामदार व उपभापती सुहास बोराटे, गटविकास अधिकारी आबासो पवार यांच्या उपस्थितीत तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक सोमवार दि. १ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता आयोजित करण्यात आली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. कोरबू यांनी दिली.
२५ ॲपेरिक्षा भरून टायर :
रेठरे बुद्रुक गावात चिकुन गुनिया व डेंग्यू साथीचा प्रार्दुभाव झाला आहे. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीने तातडीने उपाय योजना म्हणून गावच्या सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छते बरोबर घरोघरी जावून परिसराशिवाय घर, टेरीस आदी ठिकाणचा कचरा उचलण्यास सुरूवात केली आहे. यात तब्बल पंचवीस ॲपेरिक्षा भरून गाड्यांचे टायर पंचायतीने ताब्यात घेतले. तसेच गटारे वाहती केली जात असल्याचे ग्रामविकास अधिकारी शरद बागडे यांनी सांगितले.
सभापतींसह जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पाहणी
तालुक्यात मोठी लोकसंख्या असणाऱ्या रेठरे बुद्रुक गावात चिकुन गुनियाची साथीचा प्रार्दुभाव झाल्याने जिल्हा उपआरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, हिवताप जिल्हा प्रमुख आदींनी गावची पाहणी करून पंचायतीसह आरोग्य विभागास भेट दिली आहे. शुक्रवारी पंचायत समितीच्या सभापती फरिदा इनामदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार तसेच जि. प. सदस्या शामाबाला घोडके यांनी गावाला भेट देऊन ग्रामस्थांना स्वच्छतेचे आवाहन केले व आरोग्य विभागालाही अलर्ट राहण्याच्या सुचना केल्या आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |