सातारा : कण्हेर रोडवरील एका हॉटेलमधील मॅनेजरवर जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी अखेर सातारा तालुका पोलिसांनी दोन दिवसानंतर संशयितांना जेरबंद केले. अटक केलेले संशयित सातारा व कोरेगाव तालुक्यातील आहेत. दरम्यान, संशयितांमध्ये दोन अल्पवयीन मुले असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
प्रतिक दीपक येवले (वय 19), आकाश संपत बोतालजी (वय 19), ऋषीकेश विजय बुधावले (वय 19, तिघे रा.कोरेगाव), कुणाल विश्वास मोरे (वय 19), प्रकाश सुनील शिवदास (वय 19, दोघे रा.अंबदेरे, संगममाहुली ता. सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे असून इतर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, मनिंदर कृष्णदेव वाघमळे (वय 32, रा. कण्हेर ता.सातारा) यांनी याबाबतची तक्रार दिली असून ते स्वत: जखमी झाले आहेत. तक्रारदार हे हॉटेल साई सागरचे मॅनेजर आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, संशयित सातजण दि. 9 रोजी दुपारी हॉटेल साईसागरमध्ये जेवण करण्यासाठी बसले होते. जेवण सुरु असताना संशयित दंगा करत होते. त्यावेळी दुपारीचे तीन वाजले होते. संशयितांचा दंगा जास्तच वाढल्याने तक्रारदार हॉटेलचे मॅनेजर यांनी दंगा करु नका, असे म्हटले. यावरुन संशयित चिडले व त्यांनी मॅनेजरला शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. या सर्व घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी हॉटेलमधील निलेश सुळके, बाळासाहेब घागरे यांनी भांडणे करु नका, असे म्हटले असता संशयितांनी थेट त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान एका संशयिताने तिघांना जिवे मारण्याच्या उद्देशाने धारदार चाकू काढून तक्रारदार मनिंदर वाघमळे यांच्यावर हल्ला केला. या घटनेत ते जखमी झाले. हल्ला झाल्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. जखमी अवस्थेत मनिंदर वाघमळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी जखमीचा जाबजबाब घेतल्यानंतर संशयितांविरुध्द हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात केला. या प्रकारामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेनंतर तीन दिवस तालुका पोलिसांना संशयितांना शोधण्यात अपयश येत होते. अखेर सर्व संशयितांबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी ताब्यात घेवून अटक केली. संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. पोलिस हवालदार दादा परिहार, राजेंद्र वंजारी, सुजीत भोसले, महेंद्र पाटोळे, सनी आवटे, सागर निकम, संदीप कुंभार, रमेश चव्हाण, नितीराज थोरात, विश्वनाथ आंबाळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |

मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |
उदयनराजे यांनी केली पंतप्रधान मोदी यांच्या कराडमधील सभास्थळाची पाहणी |