12:25am | Oct 28, 2018 |
कराड : गोवारे, ता. कराड येथील चौंडेश्वरी नगरमधील अनधिकृत मस्जीदीचे बांधकाम हटविण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असणारे उपोषण सहाव्या दिवशी प्रशासनाच्या मध्यस्थिने स्थगित करण्यात आले. प्रांताधिकारी हिम्मत खराडे, पोलिस उपविभागीय अधिकारी नवनाथ ढवळे, तहसीलदार राजेश चव्हाण, गटविकास अधिकारी आबासाो पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. संबंधित ठिकाणच्या अनधिकृत मस्जीदीेचे बांधकाम हटविण्याचे लेखीपत्र उपोषणकर्त्यांना देण्यात आले.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, शिवप्रतिष्ठाणचे पदाधिकारी उपस्थित होते.
गोवारे, ता. कराड येथील चौंडेश्वरीनगर येथील शासकीय जागेत मस्जीदीचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम हटविण्यासाठी येथील ग्रामस्थ गेल्या अकरा महिन्यांपासून प्रशासनाकडे पाठपुरवा करत होते. मात्र, कोणतीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले. त्यानुसार रणजित पाटील, शंकर कापसे, रविंद्र डांबे, परशुराम खुडे आदींनी दि. २२ ऑक्टोबरपासून येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास सुरूवात केली होती.
हे उपोषण स्थगित करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने चर्चेला सुरूवात केली होती. मात्र, उपोषणकर्तर्े आपल्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळे प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली. त्यात आंदोलनाच्या पाचव्या दिवशी शंकर कापसे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन उग्ररूप धारण करणार की काय? अशी भिती निर्माण झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारंबळ उडाली होती.
दरम्यान, या उपोषणाच्या अनुषंगाने संपूर्ण प्रकरणाची कागदपत्रे, सिटी सर्व्हेउतारे, नकाशे तसेच जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची प्रत आदींचा अभ्यास करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरू करण्यात आली. शनिवारी सायंकाळी तहसील कार्यालयात तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठकीनंतर त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी संबंधितांशी चर्चा केली. तसेच चौंडश्वरीनगर गोवारे येथील मस्जीदीचे करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम प्रशासनाच्यावतीने हटविण्यात येईल, असे प्रशासनाच्यातीने उपोषकर्त्यांना लेखीपत्र देण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांहस्ते सरबत घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले.
प्रशासनाचे ग्रामपंचायतीला पत्र :
प्रशासनाकडून ग्रामपंचायतीस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गोवारे, चौंडेश्वरीनगर येथील कोणतेही बेकायदेशीर, विनापरवाना व अतिक्रमीत बांधकाम सिद्ध करण्याची व कारवाई करण्याची जबाबदारी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५२ व ५३ प्रमाणे ग्रामपंचायतीची आहे. ग्रामपंचायतीने त्यांच्या स्तरावर ते अतिक्रमण काढण्याबाबत दि. ३० नोव्हेंबरपर्यंत नियमानुसार उचीत कार्यवाही व कारवाई करून अहवाल कार्यालयास सादर करावा. तसेच संबंधित अतिक्रमणावर कारवाई न केल्यास ग्रामपंचायतीस जबाबदार धरून कार्यकारणीविरूद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम ३९ अन्वये कर्तव्यात कसूर केल्याबद्दल कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविला जाईल.
संभाजी भिडे यांची आंदोलनस्थळी बैठक
शुक्रवार दि. २६ रोजी रात्री ९ वाजण्याच्यासुमारास शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. यावेळी गोवारेचे सरपंच व उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. यादरम्यान तहसीलदार व ग्रामविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत आंदोलन स्थळावर बैठक झाली. यावेळी वजूखाना, पत्राशेड, विट बांधकामाबरोबर मस्जीदीची इमारत सुध्दा बेकायदेशीर असल्याबाबतची तक्रार चर्चेदरम्यान करण्यात आली.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |