07:41pm | Jun 17, 2018 |
सातारा : ‘बोल तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’, ही म्हण सर्वश्रुत आहे. आपल्या भाषणातून जगाला उपदेशाचे डोस पाजणार्या आणि जनतेच्या पाठिशी सदैव उपस्थित राहण्याचे आश्वासन देणार्या नेत्यांनी एका अपघातस्थळी अपघातग्रस्तांकडे पाठ फिरवून निघून जाणे पसंत केले. आज सकाळी राजुरी, ता. फलटण येथे दुचाकीवरुन जाणार्या माजी सैनिकाच्या पत्नीचा व मुलाचा भीषण अपघात झाला. यामध्ये मुलगा जागीच ठार झाला, तर पत्नीला फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटीलही होते. मात्र, त्यांनी जखमींना मदत करण्याचे सोडून घटनास्थळावरुन काढता पाय घेत पोबारा केला. यामुळे घटनास्थळी त्यांच्या विरोधात प्रक्षुब्ध वातावरण निर्माण झाले होते.
2009 साली मतदारसंघ पुनर्रचनेत माढा लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला होता. या मतदारसंघात जिल्ह्यातील फलटण, माण-खटाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला. या मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी प्रथमपासून रस्सीखेच सुरु होती. अखेर कोणीच नको, मीच उभा राहतो, असे म्हणत राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनी या मतदारसंघातून शड्डू ठोकला होता. 2009 ते 2014 पर्यंत शरद पवारांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. यानंतर शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याचा मानस व्यक्त केल्यानंतर पुन्हा या जागेवर कोण? असा प्रश्न निर्माण झाला होता. सभापती मिस्टर रामराजे, की विजयसिंह मोहिते-पाटील यावर घोडे अडले होते. शेवटी राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार यांनी विजयसिंह मोहिते पाटलांच्या नावाला पसंती दिली होती. त्यामुळे हा तिढा सुटला होता. शेवटी 2014 साली झालेल्या या निवडणुकीमध्ये विजयसिंह मोहिते पाटलांचा निसटता विजय झाला होता. शेतकरी संघटनेच्या सदाभाऊंनी शेवटपर्यंत कडवी झुंज दिली होती. फलटणच्या माढा मतदारसंघात येणार्या सातारा जिल्ह्यातील तालुक्यातून राष्ट्रवादीला कमी मतदान झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव होणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतू अखेर विजयसिंह मोहिते पाटलांनी माढा मतदारसंघातून विजय मिळवला. परंतू या विजयाचा गुलाल फलटण, माण-खटावमध्ये अद्यापही पोहोचलेला नाही. मतदारसंघाचे खासदार म्हणून फलटण व माण-खटावमध्ये मोहिते पाटलांची पाटी चार वर्षे झाली तरी कोरीच आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे विकासाच्या व प्रश्नांच्या बाबतीत फलटण, माण-खटावला सापत्नभावाची वागणूक देत आले आहेत, असा आरोप त्यांच्यावर वारंवार झालेला आहे. सेलिब्रिटींच्या खेळात फेमस झालेला आणि या दुष्काळी तालुक्यांचा ज्वलंत प्रश्न असलेल्या जलसंधारणाच्या कामातही त्यांचे अस्तित्व दिसून आले नाही. ते फक्त हारतुरे घेण्यासाठी मतदारसंघात येत असतात. तरीही या तालुक्यातील लोकांनी त्यांना कधीही कोसलेले नाही. परंतू आजसकाळी झालेल्या अपघाताच्या स्थळावरुन विजयसिंह मोहिते पाटलांनी काढता पाय घेतल्यामुळे ‘येथे माणुसकीही ओशाळली’ अशी भावना उपस्थित लोकांची झाली होती.
आज सकाळी साडेअकराच्या दरम्यान राजुरी (चौफुला), ता. फलटण येथे दुचाकीवरुन जाणार्या माजी सैनिकाच्या पत्नी व मुलाचा कारला धडकून भीषण अपघात झाला होता. याच दरम्यान, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील माळशिरसहून फलटणकडे एका कार्यक्रमासाठी निघाले होते. त्यांनी अपघातस्थळी आल्यानंतर मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून जखमींना मदत करणे हे गरजेचे असताना बघ्याची भूमिका घेतली. याठिकाणी अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्या शिवराज राजाराम चौधरी (वय 18) रा. एकशिव, ता. माळशिरस, जि. सोलापूर या युवकाचा जागीच मृत्यू झाला होता, तर त्याची आई या अपघातात गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर फलटण येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार हे महाराष्ट्र दौर्यावर असताना त्यांच्यासमोर असे अनेक अपघात झाले आहेत. परंतू त्यांनी पुढील कार्यक्रमाची पर्वा न करता जखमींना स्वत: पुढे होवून मदत केली आहे. प्रसंगी स्वत:च्या वाहनातूनही त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. असे असताना मतदारसंघातीलच अपघातग्रस्तांकडे कानाडोळा करुन तेथून काढता पाय घेणार्या खा. विजयसिंह मोहिते पाटलांवर उपस्थितांनी टीकेची झोड उठवली होती. एखाद्या लोकप्रतिनिधीने मतदारसंघातील अपघाग्रस्तांप्रती दाखवलेल्या असंवेदनशीलतेने येथे मृत्यूही ओशाळला, अशी चर्चा आज फलटण तालुक्यात दिवसभर आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |