खटाव : राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांना दि.२६ ते ३१ आँगस्ट कालावधी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात क्रांतीज्योती अंतर्गत महिला सदस्यांना दि.२६ ते २८ आणि पुरुष सदस्यांना दि.२८ ते ३१ आँगस्ट या कालावधीत पंचायत समितीच्या सभागृहात ही प्रशिक्षण होणार आहेत. त्यासाठी सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी उपस्थिती रहावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी केले आहे.
राज्य शासनाचा ग्राम विकास विभाग, यशदा-पुणे, सातारा जिल्हा परिषद, रयत शिक्षण संस्थेचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र, वर्ये आणि खटाव पंचायत समिती यांनी संयुक्तपणे ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत होणाऱ्या या प्रशिक्षणात ग्रामपंचायतीच्या कामकाजाची माहिती अधिकार, कर्तव्य, कामे, उपक्रम आणि लोकसहभागातून विकास कामे याबाबत परिपूर्ण माहिती यशदाचे प्रविण तज्ञ मार्गदर्शक देणार आहेत.
खटाव तालुक्यातील भूषणगड, लांडेवाडी, उबरमळे, काटेवाडी, पांगलखेल, दरजाई, धकटवाडी, पोपळवाडी, पवारवाडी, वाकळवाडी, वर्धनगड, कटगुण, कुरोली सिध्देश्वर, कोळवाडी, शिरसवडी, फडतरवाडी (नेर), भांडेवाडी, पडळ, यलमरवाडी, अनपटवाडी, डिस्कळ, औंध, पळसगाव या ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांसाठी दि.२६ ते २८ ऑगस्ट तर पुरुष सदस्यांसाठी दि.२९ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत खटाव पंचायत समितीच्या सभागृहात प्रशिक्षण होणार आहे.
"नवनिर्वाचित सदस्य प्रशिक्षण घेऊन गावातील विकास करण्यासाठी योगदान देतील. सदर प्रशिक्षणासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी उपस्थित रहावे,"असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अविनाश फडतरे यांनी केले आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |