सातारा : फलटण पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका ज्योती खरात यांना सभेत बोलण्याची संधी न देता त्यांचा खालच्या शब्दांमध्ये अवमान केल्यामुळे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थायी समिती सदस्य व नगरसेवक अशोक जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
फलटण पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधार्यांसह विरोधी नगरसेवकांनी शहरातील विविध विकासकामांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली होती. तसेच विकासकामांच्या याद्याही मागविण्यात आल्या होत्या. त्या याद्यांबाबत विचार करुन प्रस्ताव सादर करण्यासंबंधात चर्चा झाली. नगरसेवक सचिन अहिवळे यांनी दलित विकास निधी सोडून नफा फंडातून कामे मिळाली पाहिजेत, अशी मागणी केली. त्याच धर्तीवर नगरसेविका ज्योती खरातही आपल्या प्रभागांच्या प्रश्नांसंदर्भात बोलण्यासाठी उभ्या राहिल्या असता, उपनगराध्यक्ष भोईटे यांनी सभा संपल्याचे घोषित केले, यावेळी नगरसेविका खरात यांनी मला बोलायचे आहे, असे निक्षून सांगितले. मात्र उपनगराध्यक्ष भोईटे यांनी आपला आवाज वाढवत नगरसेविका खरात यांना अपमानास्पद वागणूक दिली. या प्रकारामुळे नगरसेविका खरात यांना सभागृहातच रडू कोसळले होते. नंदकुमार भोईटे यांची मनमानी पालिकेत चालू असते. ते नगराध्यक्षांनाही जुमानत नाहीत. नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये सर्वसाधारण सभा घेवून एका महिला नगरसेवकाचा अवमान करणे नंदकुमार भोईटे यांना शोभत नाही. मागील 2011 -16 चे उपनगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे यांनीही तत्कालीन महिला कर्मचार्यांना अशीच अपमानास्पद वागणूक दिली होती. मात्र पांडुरंग गुंजवटे आता आपल्या पापाची फळे भोगत आहे. पांडुरंग गुंजवटे पासून कोणताही धडा न घेता विद्यमान उपनगराध्यक्षांनीही महिलांच्याबाबत आक्षेपार्ह मुक्ताफळे उधळलेली आहेत. वास्तविक नगरपालिकेच्या सदस्यांना सर्वसाधारण सभेमध्ये नगरसेवक व नगरसेविकांना आपली बाजू मांडण्याचा कायदेशीर अधिकार असताना दंडेलशाहीने सत्तेच्या मस्तीत असलेल्या उपनगराध्यक्षांनी नगरसेविका ज्योती खरात यांना अपमानास्पद वागणूक दिली आहे. मी गटनेता या नात्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा सातारा जिल्हाधिकारी व सातारचे पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार आहे. नंदकुमार भोईटेसारख्या मस्तवाल व्यक्तीला इथून पुढच्या काळामध्ये त्याची जागा दाखवून दिली जाईल. फलटणमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जनाची नाही तर मनाची लाज बाळगून नंदू भोईटेला त्याच्या पदावरुन हाकलून द्यावे, अन्यथा आमच्या स्टाईलने आम्ही त्याला हाकलून देणारच आहोत, असाही इशारा नगरसेवक अशोक जाधव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |