07:20pm | May 18, 2018 |
सातारा : श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले फाऊंडेशन ऑफ कल्चरल अॅक्टिव्हिटी व पंकज चव्हाण डान्स अकॅडमीच्या वतीने २५ ते २७ मे दरम्यान सातारा येथे राजधानी सातारा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. छत्रपती घराण्याचा मानाचा शिवसन्मान पुरस्कार बिग बी अमिताभ बच्चन यांना, तर श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे जीवनगौरव पुरस्कार लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्कार वितरण सोहळा दि. २७ रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शाहू स्टेडियममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत पंकज चव्हाण यांनी ही माहिती दिली. याप्रसंगी खासदार उदयनराजे भोसले, माजी नगराध्यक्षा रंजना रावत, गीतांजली कदम, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर आदी उपस्थित होते.
यावेळी जाहीर करण्यात आलेल्या सातारा गौरव पुरस्कार विजेत्यांची नावे अशी : साहित्यिक व पत्रकारिता - रफिक मुल्ला, कला व सांस्कृतिक - श्वेता शिंदे, क्रीडा (विभागून) - धावपटू ललिता बाबर, पैलवान नंदकुमार विभुते, शिक्षण - पुरूषोत्तम शेठ, उद्योजकता - अजित मुथा, आदर्श सेवा - बबनराव उथळे, छोटे उद्योजकता - राजेंद्र घुले, सामाजिक कार्य - माहेश्वरी ट्रस्ट, विशेष कर्तृत्व - मेजर गौरव जाधव, कृषी - संतोष सूर्यवंशी, आदर्श ग्राम - हिवरे (ता. कोरेगाव), पर्यावरण मित्र - विजय निंबाळकर.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |