सातारा : संपुर्ण जगात कोरोना या साथीच्या आजाराने थैमान घातले असून आपल्या देशासह महाराष्ट्रातही या साथीचा फैलाव झालेला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशभरात लॉक डाऊन घोषीत केला असून घरी राहून कोरोनाला हरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभुमीवर सातारा- जावलीचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दि. 30 मार्च रोजी होणारा वाढदिवस आपण साजरा करणार नसल्याचे जाहीर केले असून कार्यकर्ते, हितचिंतक आणि जनतेने गर्दी टाळून आरोग्य रक्षणासाठी घरीच रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
संपुर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोनामुळे आपल्या देशातही गंभीर परिस्थिती आहे. देशाचा विचार करता आपल्या महाराष्ट्रात रुग्णांची संख्या जास्त आढळून आल्याने भितीचे वातावरण आहे. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून कोणीही विनाकारण घराबाहेर फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोनापासून बचावासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाला आळा घालायचा असेल तर गर्दी टाळणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे सोमवार दि. 30 रोजी होणारा वाढदिवस आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि शुभेच्छा कायम माझ्यासोबत आहेत आणि यापुढेही राहतील. कोणीही घराबाहेर येवू नये. प्रशासनाला सहकार्य करावे. संचारबंदीचे काटेकोरपणे पालन करुन सर्वांनी स्वत:ची आणि कुटूंबियांची काळजी घ्यावी. आपण सर्वजन घरातच राहूया आणि कोरोनाला हरवूया, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी कार्यकर्ते, हितचिंतक आणि जनतेला केले आहे.
तसेच ज्यांना कोणाला शुभेच्छा द्यावयाच्या असतील त्यांनी मोबाईलवरुन शुभेच्छा द्याव्यात, मी मोबाईलवर उपलब्ध आहे. कोणीही घराच्या बाहेर पडू नये. स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या आणि कोरोनापासून सर्वांनाच वाचवा, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |