सातारा : गुरुवार दि. 31 रोजी येथील बुधवार नाका परिसरात भर वर्दळीच्या ठिकाणी गोळीबार केलेल्या व या घटनेनंतर पोबारा केलेल्या या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी ऋषभ जाधव याला आज पहाटे कोल्हापूर येथून स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे.
सातारा शहरातील बुधवार नाका परिसरात भर दुपारी पूर्व वैमनस्यातून ऋषभ जाधव (रा. रविवार पेठ, सातारा) याने आतिक शेख या युवकावर गोळीबार केला होता. मात्र आतिक शेख याने स्वत:चा बचाव केला होता. दरम्यान ही चुकवलेली गोळी येथे राहणार्या एका वीस वर्षीय युवतीच्या पोटात घुसली होती. त्यामुळे संबंधित युवती गंभीर जखमी झाली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर सातारा पोलीस दलामध्ये खळबळ उडाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट देवून नागरिकांना शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर आरोपी लवकरात लवकर पकडला जाईल, अशी ग्वाही दिली होती. या प्रकरणी ऋषभ जाधव याच्या विरोधात आर्म ऍक्ट आणि प्राणघातक हल्ला नुसार गुन्हा दाखल झाला होता.
गोळीबाराच्या घटनेनंतर ऋषभ जाधव मित्राच्या दुचाकीवर बसून फरार झाला होता. गुरुवारपासून शाहूपुरी पोलीस ठाणे, सातारा शहर पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी ऋषभ जाधवच्या मागावर होते. अखेर ऋषभ जाधव कोल्हापूर येथे असल्याचा सुगावा पोलिसांना लागला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्हाड व कर्मचार्यांनी आज पहाटे ऋषभ जाधवला कोल्हापूर येथून ताब्यात घेवून अटक केली आहे. दरम्यान, संशयिताच्या अटकेमुळे सातारा पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला असून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी सातारा पोलिसांनी कंबर कसली असून या प्रकरणातील इतर संशयितांना सोडणार नसल्याची भूमिका पोलिसांनी घेतली आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |