03:03pm | Apr 26, 2018 |
सातारा : ऐतिहासिक साता-यात पुढील वर्षी अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे यासाठी मसाप, शाहुपुरी शाखा प्रयत्नशील आहे. हे संमेलन दर्जेदार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. पुढील वर्षासाठी आठ निमंत्रणे आली असून त्यात साता-याचाही समावेश आहे. 25 वर्षानंतर साता-यात साहित्य संमेलन व्हावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी दिली.
शनिवार पेठेतील दीपलक्ष्मी सांस्कृतिक भवनात मसाप, शाहुपुरी शाखेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त ते बोलत होते. यावेळी मसाप पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, केमिस्ट असोसिएशनचे प्रवीण पाटील, किशोर बेडकिहाळ, उदाहरणार्थ नेमाडे माहितीपटाचे दिग्दर्शक अक्षय इंडिकर आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना कुलकर्णी मसाप शाहुपुरी शाखेच्या कार्याचा आढावा घेतला. शाखेमार्फत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात ते यशस्वी होण्यासाटी अनेक मान्यवर आणि जेष्ठ व्यक्तींचे सहकार्य लाभते असेही आर्वजून नमूद केले. ज्याप्रमाणे आतापर्यंत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवला त्याचप्रमाणे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करुन साता-याचे नावलौकिक वाढवण्यात येईल अशी ग्वाही दिली.
यावेळी बोलताना शिरीष चिटणीस म्हणाले, मसापच्या 70 शाखांपैकी सक्रीय कार्यरत असणा-या शाखांपैकी शाहुपुरी एक शाखा आहे. या शाखेमार्फत नेहमीच नाविन्यपूर्ण साहित्यिक उपक्रम राबवले जातात. तरुणाईंमध्ये साहित्याविषयी आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जातात. शाखेच्यावतीने साता-यात अखिल भारतीय साहित्य संमेलन व्हावे यासाठी प्रयत्न सुरु असून त्याला यश मिळावे. या संमेलनासाठी लागणार निधी उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रवीण पाटील यांनी शाखेच्या उपक्रमांना शुभेच्छा देत भविष्यात शाखेला लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी किशोर बेडकिहाळ यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे यांना जिल्हा परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. सूत्रसंचालन नंदकुमार सावंत यांनी केले तर आभार किशोर बेडकिहाळ यांनी मानले. कार्यक्रमास डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, डॉ. उमेश करंबेळकर, अॅड. चंद्रकांत बेबले, वजीर नदाफ, मसाप शाहुपुरी शाखेचे कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, शाखेचे सभासद आणि सातारकर उपस्थित होते.
उदाहरणार्थ नेमाडे माहितीपटाने रंगत
शाखेच्या वर्धापनदिनानिमित्त नेहमीच विविध स्वरुपाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी अक्षय इंडिकर दिग्दर्शित जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यावरील उदाहरणार्थ नेमाडे हा दीड तासाचा माहितीपट दाखवण्यात आला. नेहमीच्या माहितीपटापेक्षा वेगळा आणि वैशिष्टयपूर्ण मांडणी असलेल्या या माहितीपटाने शाखेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात रंगत आणली.
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |