12:30am | Feb 05, 2019 |
कोल्हापूर : बांधकाम व्यावसायिकास भागीदारी करणार असल्याचा बहाणा करून त्याची ओळख दृढ करून परकीय चलनाद्वारे जास्तीत जास्त रक्कम देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे केनिया देशातील मुथाय इसाह या 45 वर्षीय इसमाकडून अमेरिकन डॉलर्स आणि परकीय चलन जप्त केला आहे. याप्रकरणी फिर्यादी अभिजीत हंबीरराव खराडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यांमध्ये भा द वि स क 489 ड , 420, 417 प्रमाणे गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत हे उपस्थित होते
यावेळी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलकरंजी येथे राहणारे अभिजीत हंबीरराव खराडे हे बांधकाम व्यवसायिक आहेत. या बांधकाम व्यावसायिकाचा मोबाईल क्रमांक सोशल मीडियाच्या माध्यमातून केनियाच्या नौरोबी भागात राहणारा मुथाय इसाह याने काढला. खराडे यांच्याशी मुथाय यांनी फोनवरून संपर्क करत आपण बांधकाम व्यवसायात भागीदारी करणार असल्याचे सांगितले तसेच माझ्याकडे 20 मिल्लियन युरो असून भारतीय चलनाप्रमाणे त्याची किंमत 16 कोटी रुपये असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी तुम्ही मला 63 लाख रुपये द्या त्या बदल्यात मी तुम्हाला तीन कोटी वीस लाख रुपये देऊन व्यवसायात गुंतवणूक करतो असं सांगितलं परंतु खराडे यांना या व्यक्तीचा संशय आल्याने त्यांनी कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाची संपर्क साधला आणि हकीकत सांगितली
यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी आपल्या पथकासह कोल्हापुरातील हॉटेल कोहिनूर इतर छापा टाकून अंतरराष्ट्रीय गुन्हेगार असणाऱ्या मुथाय याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे भारतीय चलन अमेरिकन डॉलर्स आणि युरोज असं परकीय चलन पोलिसांनी जप्त केले तसेच त्याच्याकडून परक्या चलनाप्रमाणे लॉकरमध्ये असणारे काळे कागदी बंडल पोलिसांनी जप्त केली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे खराडे यांची आठ कोटी 36 लाख 40 हजार रुपयाची होणारी फसवणूक वाढली असल्याचे पोलिस अधीक्षकांनी यावे सांगितलं या आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराकडून केमिकल्स ,चिकट टेप, गम, हँड ग्लोज, मास्क मोबाईल आणि पासपोर्ट पोलिसांनी जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख ,अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी डोंगरे पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय पडवळ अजय काळे विलास किरोळकर, सचिन पाटील, अनिल ढवळे, महेश गवळी, संतोष पाटील, अर्जुन बंद्रे ,नामदेव यादव ,आनंद निगडे, रमेश डोईफोडे ,राजेंद्र पुजारी यांनी केली
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |