पचनक्रिया आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. याने आपण खाल्लेलं अन्न पचन होतं आणि शरीराला ऊर्जा मिळते. जे पदार्थ आपण खातो त्यातील पोषक तत्व पचनक्रियेव्दारे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचवते. पण अनेकांना पचनाची समस्या सतत वेगवेगळया कारणांनी भेडसावत असते. पचनक्रियेमध्ये असलेल्या चांगल्या-वाईट बॅक्टेरियाच्या असंतुलनामुळे पचनक्रिया बिघडते. हे संतुलन झोप, औषधे, जास्त गोड खाणे आणि मद्यसेवन यामुळे बिघडतं. तुमची ही पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी खालील गोष्टींची काळजी घेतल्यास तुमच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.
१) योग्य पध्दतीने आणि एकाग्र होऊन आहार सेवन
आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच एकत्र एकापेक्षा जास्त काम करण्याबाबत विचार करायचं असतं. खरी समस्या येथूनच सुरु होते. आयुर्वेदात नेहमी एकाग्र होऊ आहार घेण्याचा सल्ला दिली आहे. कारण असे केल्याने मेंदूला आपण घेत असलेल्या आहाराबाबत योग्य माहिती मिळते. हलकं, साधं, पौष्टिक पदार्थांचं सेवन हे पोटातील अग्नीची ऊर्जा वाढवतं.
२) अग्नी विझवणारे पदार्थ टाळा
तेलकट, थंड पदार्थ तुमच्या पोटातील पचनक्रियेसाठी आवश्यक अग्नी विझवते. अधिक प्रमाणात कोल्डड्रिंक्सचं सेवन केल्यास पचनक्रिया बिघडते. जास्त झोपणे, जास्त खाणे यानेही पोटातील अग्नीचं अस्तित्व धोक्यात येतं.
३) अग्नीची सुधारणा
तुम्ही तुमच्या पोटातील अग्नी सुधारू शकता. जेणेकरुन याचे तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. जेवणाआधी थोडं फिरल्याने तुमचा फायदा होऊ शकतो. सकाळी उठल्यावर २ ग्लास पाणी प्यायल्यासही तुमची पचनक्रिया चांगली राहते.
४) पौष्टिक आहार
ज्या पदार्थांमधून तुम्हाला पोषक तत्व मिळतील असे पदार्थ दिवसभरात खाल्ले पाहिजे. याने पचनक्रियेतील अग्नीची सुधारणा होते. तुमच्या आहारात जास्तीत जास्त भाज्या आणि फळे असणे तुमच्या पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे.
५) जेवणाची वेळ ठरवा
ही सवय अंगीकारायला थोडी कठीण आहे. पण याने तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. रोज एकाच वेळेवर जेवण करणे तुमच्या पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. याने तुमचं आरोग्यही चांगलं राहतं.
६) ताजी हवा आणि काही योगाभ्यास
जशी आग पेटवण्यासाठी अग्नीची गरज असते, तशीच पचनक्रियेतील अग्नी कायम ठेवण्यासाठी ताज्या हवेची गरज असते. सकाळी फिरायला जाणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात फिरल्याने तुम्हाला चांगली हवा मिळू शकेल.
७) योग्य प्रमाणात पाणी पिणे
रोज योग्य प्रमाणात पाणी पिणे तुमच्या पचनक्रियेसाठी फायदेशीर आहे. पाण्याने केवळ पचनतंत्रातील बॅक्टेरिया संतुलित राहतात असे नाही तर याने आहारातून मिळालेले पोषण तत्व शरीरात पोहोचवण्यासही मदत होते.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |