11:21pm | Apr 02, 2018 |
सातारा : सातार्यातील एक एक चित्रपटगृह बंद पडत असतानाच एकमेव सुरु असलेल्या राजपथावरील राजलक्ष्मी टॉकीजमध्ये ‘फुकट्यांनी’ राडेबाजी करत कर्मचार्याला मारहाण करुन काचा फोडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अनोळखीविरुध्द गुन्हा दाखल झाला असून संशयितांचा शोध सुरु आहे.
सचिन लहू साठे (वय 33) यांनी अनोळखी 9 जणांविरुध्द याबाबतची तक्रार दिली असून ते राजलक्ष्मी टॉकीज येथे कर्मचारी आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चित्रपटगृहामध्ये आत जाण्यासाठी प्रेक्षकांची गेटजवळ गर्दी झाली होती. तक्रारदार सचिन साठे हे तिकीट पाहून प्रेक्षकांना आतमध्ये सोडत होते. प्रेक्षकांना आतमध्ये सोडत असताना संशयितांपैकी काही तिकीट न दाखवताच आत गेले होते.
जे संशयित तिकीट गेटजवळ थांबले होते तही वाद घालून चित्रपटगृहामध्ये आत जावून बसले. तक्रारदार यांनी चित्रपटगृहात जावून पुन्हा तिकीटाबाबत संशयितांकडे चौकशी करत तिकीट दाखवण्याची विनंती केली. यावेळी चिडलेल्या संशयितांना तक्रारदार सचिन साठे यांच्याशी वाद घालत शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली.
पाहता पाहता वाद चिघळत गेला व संशयितांनी तक्रारदार यांना लाथा, बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. संशयितांना तक्रारदार यांना मारहाण करत चित्रपटगृहाच्या गेटपर्यंत आणले. यावेळी संशयितांनी चित्रपट गृहाची काच फोडून दहशत निर्माण केली. दरम्यान, या घटनेची माहिती शहर पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता तोपर्यंत संशयित तेथून पसार झाले.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. घटनेबाबत माहिती घेवून सीसीटीव्हीचे फुटेज घेण्यास सुरुवात केली. राजलक्ष्मी चित्रपटगृह तोडफोडप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, सातार्यातील दोनच दिवसांपूर्वी समर्थ चित्रपटगृह बंद करण्यात आले आहे. त्यापूर्वी राधिका चित्रपटगृही अशाच फुकट्यांच्या गोंधळामुळे बंद करण्यात आले आहे. सध्या एकमेव सुरु असलेल्या राजलक्ष्मी चित्रपटगृहामध्येही हुल्लडबाजांनी राडा केल्याने सातारकरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |