फलटण : पत्नीला वारंवार मारहाण, शारीरीक त्रास देवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती संतोष शिवाजी सोनवलकर (वय 38, रा.वडले ता.फलटण) याला चौथे अतिरीक्त जिल्हा न्यायाधिश वर्षा पारगावकर यांनी 5 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंड तो न दिल्यास 6 महिने साधी कैदेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, दंडाची रक्कम मृत विवाहितेची तक्रारदार आई व दोन्ही मुले यांना देण्याचे आदेश न्यायाधिशांनी दिले आहेत.
सारीका संतोष सोनवलकर (वय 34, रा.अहिरे ता.खंडाळा मूळ रा.वडले) असे विष प्राशन करुन मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांची आई इंदूबाई सदाशिव धायगुडे (रा.अहिरे) यांनी खंडाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, सौ.सारीका व संतोष सोनवलकर यांचा दहा वर्षापूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना पहिली मुलगी झाल्याने पती संतोष याने पत्नीला त्रास देण्यास सुरुवात केली. जाचहट करत मारहाण झाल्याने त्यांच्यामध्ये वाद सुरु होते. दरम्यान दुसरा मुलगा झाल्यानंतरही संतोष पत्नीला मारहाण करुन शारीरीक त्रास देत होता. वारंवार मारहाण होत असल्याने सौ.सारीका यांनी फलटण येथील महिला समूपदेश केंद्रामध्ये पतीविरुध्द तक्रार दिली. याठिकाणीही दोघांमध्ये समेट झाला नव्हता. मात्र तेव्हापासून पत्नी सारीका माहेरी दोन्ही मुले घेवून राहण्यास होती.
दि. 20 मे 2017 रोजी सौ.सारीका सोनवलकर घरी असताना पती संतोष सासरी दारु पिवून गेला व तेथे त्याने पत्नीला बेदम मारहाण केली. यावेळी मुलगी श्रावणी तेथेच होती. या घटनेनंतर सौ.सारीका यांनी विषारी औषध प्राशन केले. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र दुसर्याच दिवशी दि. 21 मे रोजी विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी दि. 24 रोजी मृत सारीका यांची आई इंदूबाई यांनी जावई संतोष सोनवलकर याच्याविरुध्द आत्महत्येस प्रवृत्त व जावहटप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. फौजदार एम.के.कदम यांनी तपास करुन जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
न्यायालयात दोन्ही पक्षातर्फे जोरदार युक्तिवाद झाला. सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरुन न्यायाधिशांनी आरोपी संतोष सोनवलकर याला शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड.मंजुषा तळवलकर यांनी युक्तिवाद केला. प्रॉसिक्युशन स्कॉडचे पोलिस हवालदार एस.आर.कुंभार, अजित शिंदे, कांचन बेंद्रे यांनी सहकार्य केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |