01:19am | Nov 24, 2018 |
कराड : मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच काँग्रेस पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांसह इच्छुक उमेदवारांची नावे मतदार यादीतून कमी करण्यासाठी ऑनलाईन बोगस अर्ज भरून ते निवडणुक आयोगाला पाठवण्यात आले. हा प्रकार माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गांभिर्याने घेतला असून ते विधानसभेच्या अधिवेशनात मुद्दा उपस्थित करून संशयितांवर कारवाईची मागणी करणार आहेत. शिवाय सोमवारी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह ज्यांच्या नावे बोगस अर्ज आले आहेत ते सर्वजण मोर्चा काढणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया निवडणूक आयोगाकडून सुरू आहे. त्या दृष्टीने मतदार यादी अंतिम करण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार नावे कमी करणे व नव्याने समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत 7 नंबरचा अर्ज हा स्वतःहून नाव कमी करण्यासाठी किंवा दुबार मतदार नोंदीवर आक्षेप घेण्यासाठी वापरला जातो. विशेषतः मलकापूर मतदार यादी भाग क्रमांक 160 ते 177 यातील मतदारांची नावे कमी करण्यासाठी 7 नंबरचा बोगस अर्ज ऑनलाईन भरण्यात आला. त्या अर्जानुसार मलकापूरमधील मतदार यादीतून नावे कमी करावीत अशा स्वरूपाचे 563 अर्ज निवडणूक आयोगाला प्राप्त झाले. हे अर्ज इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया (ई.सी.आय.) व चीप इलेक्शन ऑफिसर महाराष्ट्र (सी.ई.ओ.) या सांकेतिक स्थळावर अर्ज आले. ज्यांच्या नावांचे अर्ज भरण्यात आले त्यांना गत दोन दिवसात नाव कमी करण्यासंदर्भात नोटीसा आल्या. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली.
यासंदर्भात बोलताना माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे म्हणाले, मलकापूर नगरपरिषदेची निवडणुक लवकरच लागण्याची चिन्हे आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून मलकापूर शहराने विकासाचा मोठा टप्पा पार केला असून आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षासाठी वातावरण चांगले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच तब्बल 563 मतदारांच्या नावे ऑनलाईन बोगस अर्ज भरून त्यांचे नाव कमी करण्याचा प्रयत्न झाला. यामध्ये विशेषतः काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह जे काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्या कुटूंबातील मतदारांचा सामावेश आहे. प्रत्येक नागरिकाला मत देण्याचा लोकशाहीने दिलेला मुलभुत अधिकार आहे. हा अधिकार हिसकावण्याचा प्रयत्न होत असेल तर हे दुर्दैवी असून हा प्रकार गुरूवारी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सांगितला. त्यांनी हे प्रकरण गांभिर्याने घेत काँग्रेस पक्षाला निवडणूकीतुन बाजुला ठेवण्याचे षढयंत्र असल्याची टिका केली. विधानसभा अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे.
कराड दक्षिणचा आढावा घेण्याचे काम सुरू
मलकापुरच्या मतदार यादीतील मातब्बरांची नावे कमी करण्यासाठी बोगस ऑनलाईन अर्ज आल्यानंतर काँग्रेस समर्थकांनी गुरूवारी निवडणूक आयोगाकडे ली तक्रार करत जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांना संशयितांवर कारवाईसाठी अर्ज दिल्याचे राजेंद्र यादव यांनी सांगितले. त्यानंतर काँग्रेस खडबडून जागी झाली असून मलकापुरसह संपुर्ण कराड दक्षिण मतदारसंघातील बोगस अर्जांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. या विषयावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रथमच आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |