RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

आ.बाळासाहेब पाटील यांची पाडळी येथील पारायण सोहळ्यास सदिच्छा भेट

23 May 2019 at 01:40

कराड : गांवोगांवी होणार्‍या पारायण सोहळयांमुळे सात्वीक विचार व आचारांचा प्रचार होवून, सुसंस्कारीक युवा पिढी घडविण्यास मदत होत असून, 13 व्या शतकातील संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या नामस्मरणाचा जप आजही तितक्याच भक्तिभावाने पारायण सोहळे, अखंड हरिनाम सप्ताह याद्वारे केला जातो, हिच परंपरा पाडळी (निनाम) ता.जि.सातारा गावाने अखंड चालू ठेवली असून, या गांवाने वारकरी सांप्रदायाचा वारसा जपण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.

ते मौजे पाडळी (निनाम) ता.जि.सातारा येथील विठ्ठल मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहास दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी सह्याद्रि कारखान्याचे संचालक पैलवान संजय थोरात, जगदेवराव जाधव, माधवराव जाधव, सरपंच जीवन जाधव, ह.भ.प.आप्पा महाराज, बापूराव महाडीक, माजी सरपंच बाळू जाधव, गजानन जाधव, शामराव जाधव, व्यासपीठ चालक ह.भ.प.विजय महाराज, अशोक जाधव, महादेव महाडीक, शामराव पोतदार व ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.

धोम व कण्हेर धरणग्रस्तांचा आता थेट जलाशयात साखळी आंदोलनाचा इशारा

धोम व कण्हेर धरणासाठी शेकडो शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या पण, पुनर्वसनासाठी त्यांना आजही संघर्ष करावा लागत आहे. त्याचाच भाग म्हणून थेट धोम जलाशयात उतरून आंदोलन करण्याचा इशारा जनजागर प्रतिष्ठानचे जिल्हा समन्यवक देवराज देशमुख व श्रीहरी गोळे यांच्यासह

10 hours before

शाहूनगरमधील घुले बंधूंमुळे वाचले भेकराचे प्राण

अजिंक्यतारा किल्ल्यालगतच्या जंगलातून एक भेकर शाहूनगर परिसरात आले होते. त्याच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चवल्याने ते गंभीर जखमी झाले. या भेकराला शाहूनगर येथे राहणार्‍या संतोष घुले आणि प्रकाश घुले या दोघांनी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवले आणि त्याचे

10 hours before

मर्सिडीज-बेन्झतर्फे द्वितीय आणि तृतीय श्रेणी बाजारपेठांवर सातत्याने भर

मर्सिडिज-बेन्झ या भारतातील सर्वात मोठ्या लक्झ्युरी कार उत्पादक कंपनीने महाराष्ट्रातील आपले विश्वासार्ह भागीदार बी.यू. भंडारी मोटर्स यांच्या साह्याने आपल्या मसर्विस ऑन व्हील्सफ या नाविन्यपूर्ण ग्राहक सेवेच्या दुसर्‍या टप्प्याचा शुभारंभ केला.

10 hours before

राज्य सरकारच्या माध्यमातून उत्तर माण, टेंभूचा प्रश्न मार्गी लागेल

टेंभुच्या पाण्याचा बुडबुडाही माणपर्यंत येऊ शकणार नाही म्हणणा-यांना आम्ही टेंभूचे पाणी माण तालुक्यात आणून दाखवले आहे. आता उत्तर माणला जिहे - कटापूर योजनेतून आंधळी धरणातून पाणी उचलून देणे आणि टेंभू योजनेतील उर्वरित गावांना पाणी मिळण्यासाठी

11 hours before