सातारा : सातारा पालिकेच्या मालकीच्या घंटागाडया रस्त्यावर उतरण्यासाठी अवघे दहा दिवस उरलेले असताना वार्षिक दराचे टेंडर मात्र फाईलमध्येच रेंगाळले आहे. आरोग्य विभागाकडून कोणतीच तयारी दिसत नसल्याने आधीच सात महिने प्रलंबित पडलेला सातारकरांच्या आरोग्याचा विषय आणखी लांबणीवर पडला आहे.
सातारा पालिकेच्या मालकीच्या चाळीस घंटागाड्या तब्बल सात महिने सातारा एमआयडीसीच्या गोडाऊनमध्ये उभ्या आहेत. तब्बल सात महिने उलटले तरी सातारकरांच्या स्वच्छतेची काळजी घेणार्या घंटागाडया अद्याप रस्त्यावर आलेल्या नाहीत. याचे मूळ कारण म्हणजे घंटागाडयांच्या सेवांचे वार्षिक दर निश्चित करणे अद्याप बाकी आहे. आरोग्य विभागाने वार्षिक दराचा प्रस्ताव तयार करून तो नगराध्यक्षांच्या सहीला पाठवल्याचे सांगितले जात आहे मात्र अशी कोणतीच फाईल माझ्याकडे आली नसल्याचे नगराध्यक्षांनी सांगितल्याने नक्की फाईल गेली कुठे, याचा सस्पेन्स वाढला आहे
पूर्वी ठेकेदारी तत्वावर पालिकेच्या आरोग्य विभागाने शहरातील कचरा उचलण्याची प्रक्रिया राबवली. तेव्हा अंदाजपत्रकीय रक्कम अडीच कोटी रूपये होती. आता पालिकेने स्वतःच्या घंटागाडी खरेदी केलेल्या असताना अंदाजपत्रकीय रक्कम कमी होणे अपेक्षित आहे. मात्र हे बजेट दुप्पटीहून अधिक फुगवण्यात आल्याची चर्चा आहे. वार्षिक दराची निश्चिती व ऑनलाईन निविदा प्रक्रिया यामध्ये सोयीस्करपणे वेळकाढूपणा केला जात असल्याची चर्चा आहे. प्रत्येक घंटागाडी चा चालक व सहाय्यक असे ऐंशी जणांची सेवा ठेका तत्वावर घेतली जाणार आहे. त्यामुळे पालिकेतील राजकीय ठेकेदार सक्रीय झाले आहेत. या टेंडरसाठी काही जुने जाणकार या टेंडरची माहिती घेत आहेत. घंटागाडींच्या वार्षिक दराची निश्चिती स्थायी समितीच्या सभेत केली जाणार आहे. स्थायी समिती व अंदाजपत्रक सभेच्या तारखा पदाधिकार्यांच्या सोयीने होत असल्याने सातारा शहरार्याच्या जिव्हाळ्याचे प्रश्न लांबणीवर पडत आहेत.
खाजगी ठेकेदारांच्या स्वच्छतेची मुदत येत्या 22 फेब्रुवारी रोजी संपत आहे. संबंधित ठेकेदारांनी आरोग्य विभागाला सेवा समाप्तीचे स्मरण पत्र दिले आहे. मात्र खाजगी ठेकेदारांनी ही सेवा पुढे दोन महिने चालवावी अशी गळं आरोग्य विभागाकडून घातली जात आहे. त्यामुळे पालिकेच्या मालकीच्या घंटागाड्या शेडमध्ये च उभ्या ठेवण्यात आरोग्य विभागाला स्वारस्य असल्याची चर्चा आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |