कराड : कराड वनहद्दीत दारूची पार्टी करणाऱ्या चौघांना हटकल्यानंतर त्यांनी वनअधिकाऱ्यांवर हल्ला करत त्यांच्या अंगावर दारूच्या बाटल्या फोडल्याचा प्रकार तुळसण ता. कराड परिसरात घडला. याप्रकरणी म्हासोलीचे वनरक्षक शंकर राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही कराड ग्रामीण पोलिसात सुरू होती.
पोलिसांसह वनअधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, वनरक्षक शंकर राठोड, अशोक माने, रमेश साठे, सुभाष पाटील हे मंगळवारी दुपारी येळगांव जंगलात गस्त घालत होते. गस्त घालत असताना दुपारी वनअधिकारी डॉ. अजित साजणे यांनी त्यांना तुळसण येथे बंधाऱयाची पाहणी करायची असल्याने तिकडे बोलवले. कोळेवाडी-तुळसण रस्त्यावरून जात असताना वनहद्दीत काहीजण दारू पित बसल्याचे दिसले. अधिकाऱ्यांनी गाडी थांबवून ही वनहद्द असल्याने तुम्ही येथे दारू पित बसू नका असे सुनावले. यावर संशयितांनी वनअधिकाऱ्यांशी वादावादी सुरू केली. वाद वाढत गेल्यावर संशयितांनी वनअधिकाऱ्यांवर हल्ला चढवला. काठीने मारहाण करत शिवीगाळ सुरू केली तर काहींनी दारूच्या बाटल्या अंगावर फोडल्याचेही वनअधिकाऱ्यांनी सांगितले. हा प्रकार वरिष्ठांच्या निदर्शना आणल्यानंतर मंगळवारी सायंकाळी कराड ग्रामिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू झाले. राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |