06:46pm | Jul 12, 2018 |
सातारा : न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडी, ता. फलटण या साखर कारखान्याने 2017-18 च्या गळीत हंगामातील उसाचे 48 कोटी रुपयांचे बिल अद्याप ऊस उत्पादक शेतकर्यांना दिलेले नाही. त्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकर्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ आलेली आहे, अशी माहिती फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अँड. नरसिंह निकम यांनी पत्रकाद्वारे दिलेली आहे.
फलटण तालुक्यातील सर्वात जुना साखर कारखाना न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडी, ता. फलटण या कारखान्याच्या अध्यक्ष व संचालकांनी संगनमताने 2017-18 च्या गळीत हंगामातील शेतकर्यांच्या उसाचे 48 कोटी रुपयांचे ऊसबिल थकविले असल्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. कारखान्याने उसाचे पेमेंट वेळेवर न दिल्याने शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ शेतकर्यांना घेता आलेला नाही. त्याचबरोबर उसाला भांडवल म्हणून पतसंस्था, सोसायट्या व बँका यांच्याकडून शेतकर्यांनी कर्ज उचलले होते. ते कर्जही भरता न आल्याने कर्जावरील व्याज वाढून शेतकरी आता थकबाकीदार झाले आहेत. त्याचबरोबर दिवसेंदिवस कर्जावरील व्याजाची रक्कमही वाढत चालली आहे. या कारणामुळे सोसायट्या, बँका व पतसंस्था शेतकर्यांना नवीन कर्ज देत नाहीत. यामुळे शेतकर्यांना लाईट बिल, मुलांची शैक्षणिक फी, लग्नकार्य, दवाखान्याचा खर्च कोठून आणायचा, हा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.
ज्या शेतकर्यांनी न्यू फलटण शुगर वर्क्सला ऊस घातला आहे. ते शेतकरी आर्थिक गर्तेत सापडले आहेत. उसाचे पेमेंट मिळावे यासाठी शेतकर्यांनी फलटण तहसिलदारांना निवेदन देवून आंदोलनसुद्धा केलेले आहे. परंतू साखर कारखान्यांवर कारवाई करण्याचा अधिकार महसुली अधिकार्यांना नाही, त्यासाठी वेगळी यंत्रणा आहे. साखर आयुक्तांना साखर कारखान्यावर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. न्यू फलटण शुगर वर्क्स संदर्भात दि. 10 जुलै 2018 रोजी साखर आयुक्त संभाजीराव कडू-पाटील यांना मी निवेदन दिले असून त्या निवेदनामध्ये उसाच्या बिलाची रक्कम न्यू फलटण शुगर वर्क्सने शेतकर्यांना दिली नाही तर कारखान्याची मालमत्ता जप्त करुन व त्याची विक्री करुन शेतकर्यांचे सुमारे 48 कोटी रुपयांची देणी भागवावीत, अशी मागणी केली आहे. या निवेदनाची दखल साखर आयुक्तांनी न घेतल्यास फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी निर्णायक संघर्ष करण्याची तयारी माझी असेल. ऊस बिलाच्या लढ्यात सर्वात अग्रभागी राहून प्रश्न सोडविण्याची माझी सर्वतोपरी तयारी आहे. त्यामुळे न्यू फलटण शुगर वर्क्सने येत्या आठ दिवसांत या संदर्भात तोडगा न काढल्यास पीडित शेतकर्यांना बरोबर घेवून फलटण तालुक्यातील साखर सम्राटांच्या विरोधात तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभे केले जाईल, अशी माहिती फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अँड. नरसिंह निकम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |