RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

मतमोजणीच्या पूर्वसंध्येला सातार्‍यात पोलिसांचे महासंचलन

23 May 2019 at 03:37

सुमारे सहा हजार पोलिसांसह निमलष्करी दलाचे पथक सातारा जिल्ह्यात तैनात

सातारा : उद्या होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर आज संध्याकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली सातार्‍यातील मुख्य मार्गांवर हजारो पोलिसांनी महासंचलन केले. सातारा जिल्ह्यात मतमोजणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी हे महासंचलन केले, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान नियुक्त केलेल्या बंदोबस्तापेक्षा मतमोजणीला अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे आजच्या सातारा शहरात करण्यात आलेल्या पोलीस महासंचलनाद्वारे समोर आलेले आहे. सातारा जिल्ह्यात मतदानादिवशी 4 हजार 63 पोलीस कर्मचार्‍यांचा बंदोबस्त होता. मात्र उद्या दि. 23 रोजी होणार्‍या मतमोजणी दिवशी तब्बल 5 हजार 788 पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांसह केंद्रीय पोलीस बलाचे पथक तैनात करण्यात आले आहे. 

सतराव्या लोकसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सातारा लोकसभेसाठी 23 एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले होते. यावेळी निमलष्करी दलासह राज्यातील पाच जिल्ह्यातून पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. स्थानिक पोलीस व निमलष्करी दलासह साधारणत: साडेचार हजार पोलीस मतदाना दिवशी सातारा लोकसभा मतदारसंघात तैनात होते. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघ संवेदनशील समजला जातो. मतमोजणी दिवशी जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी खबरदारीचा उपाय म्हणून निमलष्करी दल (सीआरपीएफ), दोन क्यूआरटी पथके, स्ट्रायकिंग फोर्स, राज्य राखीव पोलीस दल, दोन आरसी पथक, गृहरक्षक दल तसेच स्थानिक पोलीस व शंभराहून अधिक पोलीस अधिकार्‍यांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक, सहाय्यक पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षकांचा त्यामध्ये समावेश आहे. 

सातारा लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या दि. 23 रोजी रात्री उशिरापर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. कालच जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्‍वेता सिंघल यांनी याबाबतची माहिती दिली होती. महसूल बरोबरच सातारा पोलिसांनीही निवडणूक निकाला दिवशी कोणत्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी कंबर कसली असून जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांना पुरेसा पोलीस बंदोबस्त दिलेला आहे. निकाला दिवशी अथवा निकालानंतर कायदा व सुव्यवस्थेचा भंग करणार्‍यांवर तसेच अफवा पसरवणार्‍यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. निकाला दिवशी कोणतीही संवेदनशील परिस्थिती हाताळण्यास सातारा पोलीस दल सक्षम असल्याची एकप्रकारे ग्वाहीच सातारा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातार्‍यात पोलीस दलाचे महासंचलन करुन दिली आहे.


नंदगिरी महाराजांवर दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याचा सोळशी ग्रामस्थांकडून निषेध

सोळशी, ता. कोरेगाव येथील शनी देवस्थानच्या नंदगिरी महाराजांवर सोळशी येथील काही लोकांनी विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला होता. नंदगिरी महाराज गेल्या अनेक वर्षांपासून सोळशी येथील शनी देवस्थानमध्ये लोकांची सेवा करीत आहेत. अशा व्यक्तीवर पूर्वग्रहदूषित

31 minutes before

श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी. पाटील यांची पुण्यतिथी साजरी

येथील श्री शिवाजी विद्यालयात स्व.पी.डी.पाटील यांचा 11 वा पुण्यस्मरण दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

13 hours before

मलकापूरच्या मतदार यादीत बोगस नावे

मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रमादरम्यान कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील मलकापूर शहरात मतदार यादीमध्ये ऑनलाईन दाखल अर्जांची पडताळणी न करता बोगस नावांचा समावेश झाला आहे. बीएलओंकडून पडताळणी व प्रत्यक्ष कागदपत्रांची तपासणी न झालेली

14 hours before

असंघटीत कामगार मेळावा हा कष्टकर्‍यांना बळ देणारा : सुदर्शन पाटसकर

युवा विकास प्रतिष्ठान कराड व भाजपा युवा मोर्चा तर्फे असंघटीत कामगार मेळाव्याचे आयोजन बाबुभाई पद्मसी शहा हॉल विठ्ठल चौक कराड येथे नुकतेच करण्यात आले. सदर मेळाव्यास मोहन जाधव संचालक पुणे म्हाडा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.

13 hours before