11:39pm | Jul 24, 2018 |
वाई : मंगळवारी वाई शहरातील सर्व व्यवहार १००% बंद ठेवून वाई करांनी मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आवाहनाला पाठिंबा देत उत्स्फूर्त बंद पाळला. शहरातील सर्व व्यवहार सकाळपासूनच बंद असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान सकाळी नऊ वाजता वाईच्या किसनवीर चौकात मराठा मोर्चाचे हजारो कार्यकर्ते जमा झाले होते. व त्यांनी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून दुचाकीवरून रॅलीने संपूर्ण शहरात फिरून त्यांनी सर्व दुकानदार, व इतर व्यवसायिकांना आवाहन करण्यात आले, त्याला वाई शहरातील व्यवसायिकांनी पाठिंबा दिल्याने पुकारलेल्या बंदला १००% यशस्वी झाले. एक मराठा लाख मराठचा पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला. सोमवारी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे यांनी गंगापूर तालुक्यातील कायगाव येथे गोदावरी नदीत मराठा आरक्षणाच्या घोषणा देत थेट जलसमाधी घेवून आपले जीवन संपविले. या घटनेचे पडसाद संपूर्ण महराष्ट्रात उमटले असून त्याला प्रतिसाद म्हणून मंगळवार दिनांक २४ जुलै रोजी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वाई शहर बंदचे आवाहन केले होते. त्याला वाईकरांचा १००% पाठिंबा मिळाला. आज बंदच्या दिवशी वाई शहरात साधी चहाची टपरी सुध्दा चालू ठेवण्यात आली नाही. यावरून समाजातील सर्व जाती-धर्माचा या मोर्चाला पाठिंबा होता हेच यावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे काकासाहेब शिंदे यांचे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचे यावरून सिद्ध झाले.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता किसनवीर चौकातून मराठा क्रांती मोर्चाच्या कमिटीने श्रध्दांजली वाहून वाईतून निघणाऱ्या मराठा मोर्चाच्या रलीला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर अतिशय शिस्तबध्द पध्दतीने वाई शहरातून दुचाकीवरून हजारो कार्यकर्ते सामील झालेली रॅली काढण्यात आली. कोणीही शिस्त मोडू नये यासाठी क्रांती मोर्चाची कमिटी झटताना दिसत होती. एकंदरीत वाईतून तरी अतिशय शिस्तबध्द पध्दतीने मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येवून किसनवीर चौकातून महागणपती पुलावरून सिद्धनाथवाडीतून वाई एसटी स्टँड वरून किसनवीर महाविध्यालय त्यानंतर बावधन नाक्यावरून वाई बाजार समिती पुन्हा द्रविड हायस्कूल जवळून कृष्णा पुलावरून भाजी मंडईतून व्यापाऱ्यांना बंदचे आवाहन करीत पुन्हा किसनवीर चौकात मोर्चाचा समारोप करण्यात आला. सकाळी अकारा वाजता वाई शहरातील सर्व रस्ते ओसाड पडलेले होते. किसनवीर चौकात नेहमीच गजबजाट असतो त्याठिकाणीही शुकशुकाट पहावयास मिळाला. संपूर्ण दिवसभर वाईतील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते बंद काळात वाईत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मराठा क्रांती मोर्चाने वाई शहरातील शाळा, महाविद्यालये, प्राथमिक शाळा यांना बंदचे आवाहन केल्याने सुट्टी जाहीर करण्यात आली. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी एस टी महामंडळाने वाई आगर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु एकदम शाळा महाविद्यालये सुट्टी जाहीर केल्याने वाई एस टी स्टँडवर प्रचंड गर्दी झाली होती. पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर एसटीच्या फेऱ्या सुरु केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय दूर झाली. तर अचानक मराठा क्रांती मोर्चा भाजी मंडई मध्ये आल्याने भाजी विक्रेत्यांची एकाच तारांबळ उडाली. एकंदरीत वाई शहरात पुकारलेला बंद १००% यशस्वी झाला.
मोर्चाने घडविले माणुसकीचे दर्शन :
वाई शहरातून मराठा क्रांती मोर्चाचे हजारो कार्यकर्ते दुचाकीवरून व्यवसायिकांना आवाहन करीत असताना किसनवीर महाविध्यालयासमोर प्रचंड गर्दी झाली असताना वाई हून पाचगणीकडे पेशंट घेवून जाणाऱ्या अँम्बुलंसला रस्ता करून देत माणुसकीचे दर्शन घडविले.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |