01:10am | Nov 04, 2019 |
भुईंज : पहिल्याच वर्षी प्रचंड प्रतिसाद लाभत ग्रीन पॉईंट भुईंज व्हिलेज मॅरेथॉनने अक्षरश: यशाचे शिखर गाठले. या मॅरेथॉनमध्ये दहा कि. मी. मध्ये रेश्मा दत्तू केवटे हिने महिला गटात तर आदिनाथ रामचंद्र भोसले यांनी पुरुष गटात विजेतेपद पटकावून भुईंज व्हिलेज मॅरेथॉनचे पहिले विजेते होण्याचा मान पटकावला.
भुईंज ऍक्टीव्हिटी क्लबने आयोजित केलेली मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या दिमाखात आणि उत्साहात पार पडली. सकाळी 6 वाजता या मॅरेथॉनचा शुभारंभ झाला. 10 कि. मी. मध्ये महिला गटात रेश्मा केवाटे, स्नेहल हिरवे, प्रतिक्षा मांढरे यांनी तर पुरुष गटात आदिनाथ भोसले, आकाश परदेशी, बाळू पुकाटे या तिघांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. 5 कि. मी. महिलांमध्ये विशाखा साळुंखे, वृषाली शिंदे, नेहा धनावडे यांनी तर पुरुष गटात प्रतिक उंबाळकर, विक्रांत कारंडे, हरिदास शिंदे यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले. 3 कि. मी. महिला गटात श्रावणी लिबे, राजनंदिनी डेरे, स्वरांजली पोळ यांनी तर पुरुष गटात आकाश सूर्यवंशी, शुभम दगडे, धीरज ढमाळ यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.
या मॅरेथॉनमध्ये साडेसहाशे स्पर्धक सहभागी झाले होते. भुईंज येथील शिवाजी मैदान ते किसन वीर कारखाना व तेथून परत शिवाजी मैदान असा या स्पर्धेचा मार्ग होता. 3 कि.मी मॅरेथॉनचा शुभारंभ सौ. संजिवनी राजेश स्वामी, 5 कि. मी. मॅरेथॉनचा शुभारंभ सदाशेठ गाडे, सुधाकर भोसले व 10 कि. मी. मॅरेथॉनचा शुभारंभ धनंजय पावशे यांच्या हस्ते करण्यात आला. तर बक्षिस वितरण सपोनि श्याम बुवा, उपसरपंच प्रशांत जाधवराव, प्रायोजक अमर कोल्हापुरे, सौ. प्रिती कोल्हापुरे, सौ. मनिषा विजयसिंह जाधवराव, महेश बाबर, अंकुश शिंदे, सुनिल लोखंडे, राहुल माने, ज्योतिकांत भोसले, विजयकुमार महामुनी, बाळासाहेब जाधवराव, रामदास वालेकर, रामशेठ कर, रमेशशेठ चिकणे, वाई तालुका केमिस्टचे उपाध्यक्ष विजय कणसे, श्रीधर फाळके, अजिंक्य जाधवराव, सातारा शारिरीक शिक्षक संघटनेच्या पदाधिकार्यांच्या हस्ते करण्यात आले. अत्यंत भव्य आणि नेटके नियोजन हे या मॅरेथॉनचे वैशिष्ट्य ठरले.
यावेळी बोलताना डॉ. संदीप काटे म्हणाले, थक्क व्हावं एवढं भव्य आणि अतिशंय नेटकं नियोजन इथं झालं आहे. पहिल्याच वर्षी करण्यात एवढ्या दिमाखात आयोजित केलेली ही मॅरेथॉन नक्कीच मोठा टप्पा गाठणार आहे. यापुढे कधीही, काहीही सहकार्य मागा ते नक्की देवू. भुईंज व्हिलेज मॅरेथॉन हे नाव खूपच मोठे झाले असून या ठिकाणी येणं हा आमच्याच अतिशय आनंदाचा भाग आहे. भुईंज ऍक्टीव्हीटी क्लबच्या सर्व पदाधिकार्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले.
सातार्याहून धावत येवून दिल्या शुभेच्छा..
भुईंज व्हिलेज मॅरेथॉनची खूपच मोठी चर्चा झाली. ग्रामीण भागात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या या मॅरेथॉनला शुभेच्छा देण्यासाठी सातार्याहून भुईंज येथे धावत येवून सातारा हिल मॅरेथॉनचे संस्थापक डॉ. संदिप काटे तसेच दिपाली यादव, मिलिंब हबळे, निरंजन पिसे, सुभाष भोसले, नितीन किर्वे आदी सहकार्यांनी शुभेच्छा दिल्या. भल्या पहाटे 25 कि. मी. धावत आलेले हे सर्वजण जेव्हा भुईंजमध्ये आले तेव्हा अलोट गर्दीने एकच जल्लोष करत त्यांचे स्वागत केले.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |