मॅन्चेस्टर : भारतानं पहिला टी-20 सामना जिंकत इंग्लंड दौऱ्याचा विजयी श्रीगणेशा केला आहे. कुलदीप यादवच्या पाच विकेट आणि लोकेश राहुलचं तुफानी शतक सामन्यात निर्णायक ठरलं. मात्र चर्चा भारताचा कर्णधार विराट कोहलीची जास्त सुरु आहे. विराटनं या सामन्यात नव्या विक्रमाला गवसणी घातली. विराटनं या सामन्यात नाबाद 20 धावांची खेळी केली.
विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये जलद 2000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराटनं 8 धावा केल्या आणि हा विक्रम आपल्या नावे केला. आतंरराष्ट्रीय टी-20मध्ये 2000 धावांचा पल्ला गाठणारा विराट चौथा खेळाडू ठरला आहे.
विराटने अवघ्या 56 सामन्यात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. याआधी हा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रॅन्डन मॅक्क्युलमच्या नावे होता. टी-20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्तिल 2271 धावांसह आघाडीवर आहे. ब्रॅंडन मॅक्क्युलम 2140 धावांसह दुसऱ्या तर पाकिस्तानचा शोएब मलिक 2039 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
भारताची विजयी सुरुवात
कुलदीप यादवच्या पाच विकेट आणि लोकेश राहुलच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा 8 विकेट्सनी धुव्वा उडवला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं भारताला विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं. लोकेश राहुलनं अवघ्या 54 चेंडूंत दहा चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 101 धावांची खेळी उभारुन भारताला विजयपथावर नेलं.
राहुलनं रोहित शर्माच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी 123 धावांची भागीदारी केली. रोहित बाद झाल्यानंतर राहुल आणि विराट कोहलीनं 40 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |